Join us  

या दोघींच्या आगमनाने खूश झालीये प्राजक्ता माळी, तिच्यासाठी आहेत या खूपच स्पेशल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 8:36 PM

प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देप्राजक्ताने या फोटोसोबत लिहिले आहे की, साखरेचं पोतं आणि गुळाची ढेप मुंबईत दाखल... दुग्धशर्करा योग... प्राजक्तासोबत फोटोत असलेल्या या दोघी तिच्या भाच्या असून त्यांचे नाव याज्ञसेनी आणि शिवप्रिया असे आहे.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत आपल्याला एक चिमुकले बाळ आणि एक छोटीशी मुलगी पाहायला मिळत आहे.

प्राजक्ताने या फोटोसोबत लिहिले आहे की, साखरेचं पोतं आणि गुळाची ढेप मुंबईत दाखल... दुग्धशर्करा योग... प्राजक्तासोबत फोटोत असलेल्या या दोघी तिच्या भाच्या असून त्यांचे नाव याज्ञसेनी आणि शिवप्रिया असे आहे. या दोघी त्यांच्या आत्याप्रमाणे गोड दिसतात असे प्राजक्ताचे फॅन्स सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत.

प्राजक्ताच्या या भाच्या काहीच तासांत सोशल मीडियावर फेमस झाल्या आहेत असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण केवळ काहीच तासांत प्राजक्ता आणि तिच्या या गोंडस भाचींच्या फोटोला तब्बल नव्वद हजार लाईक्स मिळाले आहेत. आत्या आणि तिच्या भाच्या दोघीही खूपच छान दिसतात असे प्राजक्ताचे फॅन्स तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी