Join us  

प्राजक्ता माळीच्या फोटोतील एक्सप्रेशनची सोशल मीडियावर रंगलीय चर्चा, मित्रासोबत केला फोटो पोस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 12:57 PM

प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देप्राजक्ता माळीने तिचा मित्र फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबत नुकताच फोटो शेअर केला आहे

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे कुटुंबियांचे फोटो, चित्रीकरणाच्यावेळेसचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिने सोशल मीडियावर नुकताच शेअर केलेला एक फोटो सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोत आपल्याला तिला आणि प्रसिद्ध फोटोग्राफर तेजस नेरुरकरला पाहायला मिळत आहे.

प्राजक्ता माळीने तिचा मित्र फोटोग्राफर तेजस नेरुरकरसोबत नुकताच फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत कॅप्शन लिहिले आहे की, त्याची आवडती पोझ आणि माझे आवडते एक्सप्रेशन... शुटिंग करताना आम्ही नेहमीच धमाल मस्ती करतो असे मी नेहमीच लिहिणार नाही, असा देखील तिने तेजसला टोला मारला आहे. पण तू काढलेले फोटो पाहायला मला नेहमीच आवडतात असे तिने आवर्जून सांगितले आहे. 

प्राजक्ताचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून केवळ काहीच तासांत हा फोटो 53 हजाराहून अधिक लोकांनी लाईक केला आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. प्राजक्ता प्रशिक्षित भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने अरंगेत्रम आणि विशारद पूर्ण केले आहे. यासह प्राजक्ताला सांस्कृतिक विभागाकडून भरतनाट्यमसाठी शिष्यवृत्तीही देण्यात आली आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी