Join us

Prajakta Mali : 'तुमचे किती आणि कसे आभार मानू?'; प्राजक्ता माळीची आई वडिलांसाठी स्पेशल पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 14:58 IST

अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali)ची सध्या एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) हे नाव सध्याच्या घडीला कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. मालिकांपासून कारकीर्दीची सुरुवात करणारी प्राजक्ता सध्याच्या घडीला बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे. प्राजक्ताची नुकतीच रिलीज झालेली रानबाजार वेबसीरिजची खूप चर्चा झाली. या सीरिजमध्ये पहिल्यांदाच अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. तसेच तिचा 'वाय' चित्रपटही रिलीज झाला. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.

प्राजक्ता माळीने तिच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, आई पप्पा - तुमचे किती आणि कसे आभार मानू? आम्हां मुलींच्या जन्माचं तुम्ही फक्त स्वागत नाही तर सोहळा केलात..#मीआणिमाझ्याभाच्या. मुलींना वाचवा. वाय चित्रपट पोचला पाहिजे, जीव वाचला पाहिजे.

अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्राजक्तासह मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नंदू माधव, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले आणि ओमकार गोवर्धनही दिसणार आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो आहे.

हायपरलिंक... हायपरलिंक...असं सारखं म्हटलं जातंय. साध्या भाषेत याचा अर्थ सांगायचा झाल्यास एका टाईमलाईनमध्ये, एकाच वेळेत अनेक ठिकाणी घडलेले प्रसंग शेवटी एका गोष्टीला येऊन मिळतात. अनेक नद्या एकत्र येऊन समुद्र तयार होतो. तसा हा हायपरलिंक सिनेमा असणार असल्याचं मुक्ता बर्वेने सांगितले होते.

टॅग्स :प्राजक्ता माळीमुक्ता बर्वे