Join us  

या अभिनेत्रीने सुरु केले 'दगडी चाळ 2' चे शूटिंग, शेअर केला सेटवरचा हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 10:39 AM

या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने जंगली सिनेमातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे.

या अभिनेत्रीने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. काही महिन्यांपूर्वी तिने जंगली सिनेमातून बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. 'जंगली' सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेचे देखील सर्वत्र कौतुक झाले होते. आम्ही बोलतोय अभिनेत्री पूजा सावंत बाबत. पूजा सावंतने मराठी क्षणभर विश्रांती या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. यानंतर आता गं बया, झकास, सतरंगी रे, दगडी चाळ, नीळकंठ मास्तर अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. विविध सिनेमांमधून दर्जेदार भूमिका साकारत चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पूजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. तसेच आपल्या आगामी प्रोजेक्टबदलची माहिती ही पूजा तिच्या फॅन्सना देत असते.

नुकतेच पूजाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सला 'दगडी चाळ 2' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे सांगितले आहे. पूजाने सेटवरचे संवाद वाचतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोला पूजाने एक कॅप्शन लिहिले आहे, '''वर्क मोड ऑन, डीसी2.'' फॅन्सनी पूजाला नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

पूजा आणि अंकुश चौधरीच्या जोडीचा दगडी चाळ सिनेमा चांगलाच हिट झाला होता. चाहत्यांना या दोघांची जोडी खूपच भावली होती. त्यानंतर आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

टॅग्स :पूजा सावंत