Join us  

'पाँडेचेरी' द्वारे अमृता करणार नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात,फोटो शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 2:30 PM

या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून, सध्या ती त्याच्या स्क्रिप्ट रिडींगमध्ये व्यस्त आहे. थोडक्यात काय तर, नवीन वर्षाच्या अमृतमय स्वागतासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित.

मराठी सिनेमात निरनिराळ्या गोष्टी दिग्दर्शकांकडून आजमावल्या जात आहेत. त्यामुळं की काय हे सिनेमा रसिकांकडून डोक्यावर घेतले जात आहेत. या विविध पुरस्कारांवर हे सिनेमा मोहोर उमटवत आहेत. आता असाच काहीसा प्रयोग दिग्दर्शक सचिन कुंडलकर करत आहे.  सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या नवीन वर्षाची सुरुवात एका धमाकेदार करणार आहे. मराठी सिनेइंडस्ट्रीतील तगड्या स्टारकास्टचा समावेश असलेल्या 'पाँडिचेरी' या चित्रपटाद्वारे ती प्रेक्षकांसमोर येणार आहे.

विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या निमित्ताने 'पॉंडिचेरी'चे दिग्दर्शक सचिन कुंडलकर सोबत ती पहिल्यांदाच काम करणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार असून,सध्या ती त्याच्या स्क्रिप्ट रिडींगमध्ये व्यस्त आहे. थोडक्यात काय तर, नवीन वर्षाच्या अमृतमय स्वागतासाठी तिचे चाहतेदेखील उत्सुक झाले असतील, हे निश्चित.

शीर्षकावरुनच हा सिनेमा कथा पॉण्डेचेरीशी संबंधित असणार आहे. खुद्द सचिनने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. एरव्ही मुंबई, पुणे, कोकणात मराठी सिनेमांचं शुटिंग होतं. मात्र सचिनच्या या सिनेमाचं शुटिंग निसर्ग सौंदर्याने नटलेल्या पॉण्डेचेरीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सचिनने दिली आहे. मात्र या पलीकडे आणखी एक खासियत सचिनच्या या सिनेमात आहे. सचिनचा हा सिनेमा पूर्णपणे स्मार्टफोनवर चित्रीत करण्यात येणार आहे.  

स्मार्टफोनवर शुटिंगचा हा अनुभव सचिनसाठी पहिलाच असणार नाही.कारण याआधी त्याने 'गुलाबजाम' या सिनेमाचा सुरुवातीचा सीन स्मार्टफोनवरच चित्रीत केला होता. आजमितीला बरेच आंतरराष्ट्रीय सिनेमांचं शुटिंग स्मार्टफोनवर चित्रीत केले जातात. मात्र पॉण्डेचेरी सिनेमा फक्त पुरस्कारासाठी करत नसल्याचे सचिनने स्पष्ट केले आहे. 

 

टॅग्स :अमृता खानविलकर