Join us  

अन् सत्य खाडकन थोबाडीत मारल्यासारखं समोर उभं राहिलं...! फुलवाची ‘वास्तव’ मांडणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 2:02 PM

माझा हा सगळा आव आता गळून पडला आहे....! Phulawa Khamkar ने सांगितला अनुभव

ठळक मुद्देफुलवाने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहून ही आपबीती सांगितली आहे.

कोरोना रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक कोणत्या स्थितीतून जात आहेत, याची भीषणता हा व्हायरस तुमच्या घरात आल्याशिवाय जाणवणार नाहीत... होय, हे शब्द आहेत, मराठमोळी प्रसिद्ध डान्सर, कोरिओग्राफर फुलवा खामकर (Phulawa Khamkar) हिचे. अलीकडे फुलवाच्या काकांना कोरोनाने ग्रासले आणि त्यांना रूग्णालयात बेड मिळावा म्हणून अख्खे खामकर कुटुंब वणवण फिरत होते. फुलवा खामकर सेलिब्रिटी असूनही तिच्या काकांना बेड मिळत नव्हता.फुलवाने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहून ही आपबीती सांगितली आहे. (Phulawa Khamkar POST on coronavirus)

ती लिहिते...‘करोना घरापर्यंत आला...आम्हाला मागच्या वर्षी झाला तेव्हा त्याची झळ पोहचली नव्हती ती आत्ता जास्त प्रकर्षाने जाणवली...माझा अत्यंत लाडका छोटा काका जेव्हा व्हेंटिलेटर गेला तेव्हा.....

आता कोणी ऐकणार नाहीये, करोना ची काय भीती ठेवायची आता? जगण्यासाठी काम तर केलंच पाहिजे ना? बघा कसं सगळं नॉर्मल चाललं आहे बाहेर...हो हो मी पण क्लासेस घेते आहे ना.....इथे सगळं ओ के आहे असं माझ्या म्यांचेस्टर इथे राहणाऱ्या डॉक्टर बहिणीला बोलणारी मी.... आणि माझ्यासारखे अनेक!!! माझा हा सगळा आव आता गळून पडला आहे.... हवं ते हॉस्पिटल सोडा पण आपल्याला साधा बेड मिळत नाही म्हणजे काय, टीव्ही वर जे सतत सांगत आहेत की आॅक्सिजन बेड सुद्धा उपलब्ध नाहीये म्हणजे काय, व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणजे काय हे सत्य खाडकन थोबाडीत मारल्यासारख समोर उभं राहिलं आणि अगदी आपल्या घरापर्यंत आलं.

माझा स्वभाव अत्यंत आशावादी आणि सकारात्मक विचार करणारा असल्यामुळे असेल कदाचित पण कोणतीही प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आपल्याला खूप काही देऊन जाते ,शिकवते ,घडावते यावर माझा ठामपणे विश्वास आहे. कोविड 19 सुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जातोय ही वस्तुस्थिती आपण बदलू शकणार नाही.

पैसे आणि ओळख या घटकांना करोना ओळखतच नाही.... करोना ने communism म्हणजेच साम्यवाद परत आणलाय हे ही तितकंच खरं. कोविड 19 सर्वांना समान लेखतो आहे.लहान मोठं,गरीब श्रीमंत,जात धर्म त्याच्या खिजगणतीत नाहीये...माणसाला तो फक्त माणूस म्हणून बघतो.... आपल्यातीलअनेकांना ही पण एक त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट!!! 

काका ला बी एम सी कोविड सेंटर मध्ये बेड मिळाला तेव्हा टाकलेला सुस्कारा मी कधीच विसरणार नाही.त्याला वाचवण्याची शर्थ करत असलेले आपले डॉक्टर.... अनेक पेशंट पैकी एक असलेल्या माझ्या काका साठी झगडणारे आपले सरकारी डॉक्टर्स,बी एम सी आणि आपली महाराष्ट्र सरकारची सिस्टीम यांना आज पुन्हा एकदा  मानाचा मुजरा!!

  

टॅग्स :फुलवा खामकरकोरोना वायरस बातम्या