Join us  

'पाटील' सिनेमाला प्रेक्षकांची पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 7:15 AM

प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात

ठळक मुद्देरसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘पाटील’ची महाराष्ट्रभर घोडदौड चालली आहे

प्रेम, ध्येय आणि नातेसंबंध या तीन पातळ्यांवर माणूस अविरत संघर्ष करत असतो. कधी हा संघर्ष स्वतःशी असतो तर कधी समाजाशी. जे धीराने आणि आत्मविश्वासाने या संघर्षाला सामोरे जातात तेच या काळाच्या कसोटीवर यशस्वी होतात. हाच संदेश देणाऱ्या ‘पाटील’ या चित्रपटावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. रसिकांच्या उदंड प्रतिसादात ‘पाटील’ची महाराष्ट्रभर घोडदौड चालली आहे. या चित्रपटाला कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, हिंगोली, नाशिक, या शहरात प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत असून कालपासून राज्यातल्या १५० हून अधिक थिएटर्समध्ये ‘पाटील’ सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील स्वप्नपूर्तीचा प्रेरणादायी प्रवास प्रेक्षकांना भावला असून चित्रपटाची गाणीही चांगलीच गाजतायेत.

प्रेमासमोर इतर सगळ्या गोष्टी गौण असतात आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर इच्छित गोष्टी साध्य करता येतात हा संदेश देत असताना वडिलांनी आपल्या मुलासाठी केलेला संघर्ष या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. संतोष राममीना मिजगर लिखित-दिग्दर्शित, ‘पाटील संघर्ष... प्रेम आणि अस्तित्वाचा’ चित्रपटात एस. आर. एम एलियन, शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे, यश या कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.

स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., साचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि. यांनी ‘या  चित्रपटाची निर्मिती केली आहे. बॉलीवूड टुरिझम आणि ‘ए व्ही के एंटरटेन्मेंट’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जयशील मिजगर, तेजल शहा, नीता लाड, सतीश गोविंदवार, गोपीचंद पडळकर, मधुकर लोलगे,  रुपेश टाक हे चित्रपटाचे निर्माते असून गणेश बीडकर,रामराव वडकुते, संतुकराव हंबर्डे, सौरभ तांडेल,  दीपक दलाल, अभिराम सुधीर पाटील सहनिर्माते आहेत. विवेक सिंग कार्यकारी निर्माते आहेत. निलेश गावंड, मनीष शिर्के यांचे संकलन तर छायांकन सुधाकर रेड्डी यकंटी, राजा यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले आहे. वेशभूषा पृथा मांजरेकर, ज्योती मुलगीर यांनी केली आहे. ध्वनी अनिरुद्ध काळे तर व्ही.एफ एक्सची जबाबदारी प्रशांत मेहता, तर कला दिग्दर्शन सुरेश पिल्ले यांचे आहे. 

टॅग्स :पाटील