‘आपलं मानूस’चा पार्ट-2 लवकरच रसिकांच्या भेटीला, लवकरच अधिकृत घोषणा, नाना पाटेकरही झळकणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:23 IST
कोणताही सिनेमा हिट झाला की लगेचच त्या सिनेमाच्या सिक्वेलच्या किंवा रिमेकच्या चर्चा सुरु होतात.त्या हिट सिनेमाची कथा रसिकांना इतकी ...
‘आपलं मानूस’चा पार्ट-2 लवकरच रसिकांच्या भेटीला, लवकरच अधिकृत घोषणा, नाना पाटेकरही झळकणार?
कोणताही सिनेमा हिट झाला की लगेचच त्या सिनेमाच्या सिक्वेलच्या किंवा रिमेकच्या चर्चा सुरु होतात.त्या हिट सिनेमाची कथा रसिकांना इतकी भावलेली असते की रसिकही काल्पनिक कथा रचू लागतात.याच गोष्टीचा फायदा निर्माते आणि दिग्दर्शक घेतात अन् रसिकांना हवं ते सिक्वेल किंवा रिमेकच्या रुपात रुपेरी पडद्यावर घेऊन येतात.गोलमाल सिनेमा सिरीज किंवा हेट स्टोरी किंवा हेराफेरी अशी बॉलिवूडमध्ये सिक्वेलची किंवा रिमेकचीही बरीच उहाहरणं आहेत.सध्या बॉलिवूडमध्ये आणखी एका सिनेमाच्या पार्ट-२ची चर्चा सुरु झाली आहे.अजय देवगण निर्मित आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘आपला मानूस’ या सिनेमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.आजही या सिनेमाच्या शोला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभतो. Also Read:आज पर्यंत कधीही न केलेलं काम पहिल्यांदाच करणार नाना पाटेकर,जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तरनाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका हे या कौटुंबिक,सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे खास वैशिष्ट्य आहे.सुमित राघवन, इरावती हर्षे यांच्याही प्रमुख आणि लक्षवेधी भूमिका या सिनेमात आहेत.विवेक बेळे यांच्या ‘काटकोन त्रिकोण’ नाटकावर आधारित असलेल्या या सिनेमाची कथा रसिकांनी डोक्यावर घेतली.सिनेमाला मिळालेले यश पाहून अभिनव शुक्ला,रोहित चौधरी,मनीष मिश्रा हे निर्माते अक्षरक्ष भारावून गेले आहेत.त्यामुळेच की काय 'आपला मानूस' या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची त्यांची इच्छा आहे.आपला मानूस सिनेमाला अभूतपूर्व यश मिळाले.शिवाय त्याची कथा रसिकांच्या काळजाला भिडणारी होती असं अभिनव शुक्लाने म्हटले आहे.या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे सिनेमाचा पार्ट-२ रसिकांच्या भेटीला घेऊन यायचा आहे आणि यांतही सध्याच्या स्थितीनुसार काही ना काही सामाजिक संदेश देणारी कथा असेल असं अभिनवने म्हटलं आहे.याबाबत सगळ्या गोष्टी लवकरच जुळून येतील आणि नव्या सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल असं त्याने स्पष्ट केले आहे.रोहित चौधरी आणि मनीष मिश्रा यांनीही अभिनवच्या सूरात सूर मिसळला आहे.'आपला मानूस' या सिनेमाचा पार्ट-२ येणार असला तरी आपले माणूस असलेले नाना पाटेकर,सतीश राजवाडे, सुमित राघवन, इरावती हर्षे हे या आगामी सिनेमाशी जोडलेले राहणार का हे मात्र गुलदस्त्यातच आहे.