Join us

​मुक्ता बर्वेचे फेसबुक पेज झाले व्हेरिफाइड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 15:09 IST

मुक्ता बर्वे फेसबुकवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिचे फेसबुकला अकाऊंट असून यात चार हजाराहून अधिक फ्रेंड्स आहेत. तसेच सत्तर हजाराहून ...

मुक्ता बर्वे फेसबुकवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिचे फेसबुकला अकाऊंट असून यात चार हजाराहून अधिक फ्रेंड्स आहेत. तसेच सत्तर हजाराहून अधिकजण तिच्या या अकाऊंटला फॉलो करतात. या अकाऊंटवर ती तिचे वैयक्तिक फोटो तर पोस्ट करत असते. पण त्याचसोबत तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी नेहमीच माहिती देत असेत. तसेच आपल्या फॅन्ससोबत सतत संपर्कात राहाण्यासाठी तिने मुक्ता बर्वे हे पेजदेखील बनवले आहे. या पेजद्वारे ती तिच्या फॅन्ससोबत नेहमीच गप्पा गोष्टी करत असते. तसेच ती फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तिच्या फॅन्सशी गप्पा मारत असते. तिचे हे फेसबुक पेज नुकतेच व्हेरिफाइड करण्यात आले आहे. फेसबुककडून पेज व्हेरिफाइड झाल्यानंतर मुक्ताने लगेचच याबाबतची पोस्ट तिच्या पेजवर टाकली आहे. त्यावेळी तिने टाकलेल्या स्मायलीमधून तिला झालेला आनंद दिसून येत आहे. तिच्या फेसबुक पेजला 98000 हून अधिक लोकांनी आतापर्यंत लाइक केले आहे. मुक्ताने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्यानंतर तिने करियसाठी पुणे सोडले आणि ती मुंबईत स्थायिक झाली. घर तिघांचे हवे या नाटकाद्वारे तिने तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या नाटकातील तिच्या कामाची चांगलीच चर्चा झाली. घडलंय बिघडलंय या मालिकेद्वारे ती प्रकाशझोतात आली. चकवा या चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार मिळाले. त्यानंतर थांग, देहभान, फायनल ड्राफ्ट यांसारखे तिचे अनेक चित्रपट गाजले. जोगवा या तिच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. छापा काटा, कोडमंत्र यांसारखी तिची नाटके प्रचंड गाजली आहेत. आज चित्रपट, मालिका, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपला ठसा उमटवला आहे. मुक्ताला आज मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.