Join us

संस्मरण कार्यकमाचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 13:20 IST

 ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या कायार्ला अभिवादन करण्यासाठी नादरूप संस्थेच्यावतीने तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...

 ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू पंडिता रोहिणी भाटे यांच्या कायार्ला अभिवादन करण्यासाठी नादरूप संस्थेच्यावतीने तीन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन कथक नृत्यांगना-गुरू कुमुदिनी लाखिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू कुमुदिनी म्हणाल्या, रोहिणीताई भाटे यांनी कथकसाठी योगदानच दिले नाही तर, आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. त्यांचा आयुष्याचा प्रवास हा फार कठीण होता. करिअरच्या सुरूवातीला नृत्य शिकविण्यासाठी त्यांनी विदयार्थी मिळविण्यासाठी खूपच मेहनत घ्यावी लागली. कथकसाठी आपला वेळ देणाºया रोहिणीताईंनी नृत्य कलाकारांच्या पिढया घडविल्या. त्यांच्या अथक प्रयत्नाने पुणे हे कथकचे माहेरघर बनले आहे. समाज कलाकार घडवत नाहीत, तर कलाकार समाज घडवतो.  कथक हे केवळ नृत्यतंत्र नाही तर ते तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे नृत्याचा आत्मा आणि नृत्याचे वैभव जपण्याचे भान ठेवा, असा संदेशही कुमुदिनी लाखिया यांनी नवोदित कलाकारांना दिला. पुण्यामध्ये नृत्यसंस्कृती रुजण्यामध्ये रोहिणीताईंच्या समर्पणवृत्तीने केलेल्या विद्यादानाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. तसेच यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अशोक वाजपेयी आणि भाटे यांच्या गुरुभगिनी पद्मा शर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ कथक नृत्यांगना-गुरू शमा भाटे यांनी सवार्चा सत्कार केला. यावेळी रोहिणी भाटे यांनी यावेळी नृत्यदेखील सादर केले आहे. त्यांनी आपल्या नृत्य सादरीकरणातून  कथक हे नृत्याचे शास्त्र असले तरी ते कोणताही दावा न करता वैदिक काव्याचे सौंदर्य उत्कृष्टरीत्या उलगडले. त्यांच्या या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच त्यांच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा अफाट प्रतिसाद मिळाला असल्याचे पाहायला मिळाले. तरूणांनीदेखील या कार्यक्रमाला गर्दी केली असल्याचे दिसले.