Join us

OMG! संजय मोने करणार घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 12:29 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नाटकांची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक मराठी नाटक येत असल्याचे दिसत आहे. असेच ...

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत नवीन नाटकांची चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. एकापाठोपाठ एक मराठी नाटक येत असल्याचे दिसत आहे. असेच एक  प्रेक्षकांचे लाडके कलाकार संजय मोने हे लवकरच एक घोटाळा करणार आहेत. घाबरू नका, अहो, घोटाळासंबंधी त्यांचे लवकरच एक आगामी नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ९ कोटी ५७ लाख हे  दोन अंकी धमाल घोटाळा असे या नाटकाचे नाव आहे. या नाटकाचे दिग्दर्शक विजय केंकरे आहेत. तर या नाटकाचे लिखाण संजय मोने यांनी केले आहे. साज प्रॉडक्शन निर्मित हे नाटक असणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक धमाल घोटाळा पाहायला मिळणार आहे. घोटाळा म्हटल्यावर प्रेक्षकांच्या डोळयासमोर अनेक घोटाळे उभे झाले असणार आहे. मात्र संजय मोने यांचे ९ कोटी ५७ लाख हे  दोन अंकी धमाल घोटाळा पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. हा घोटाळा नक्कीच विनोदी असणार आहे. त्यामुळे तो नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा करूयात. संजय मोने यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तसेच नाटक, मालिका आणि चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. ते नुकतेच पसंती आहे मुलगी या मालिकेत पाहायला मिळाले होते. त्यांनी या मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांची ही खलनायकाची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकांप्रमाणेच त्यांच्या चित्रपटांनीदेखील प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. चला तर पाहूयात प्रतिक्षा करूयात आणखी एका नवीन नाटकाची.