Join us

OMG! महेश मांजरेकर आणि श्रुती मराठे हॉलिवुडमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2017 11:55 IST

सध्या मराठी आणि बॉलिवुडचे चित्रपटातील कलाकारांचे साट-लोट मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र यंदा मराठी चित्रपटसृष्टीत काही अनपेक्षितच घडले ...

सध्या मराठी आणि बॉलिवुडचे चित्रपटातील कलाकारांचे साट-लोट मोठया प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र यंदा मराठी चित्रपटसृष्टीत काही अनपेक्षितच घडले आहे. पण ही गोष्ट प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाची आहे. कारण मराठी चित्रपटसृष्टीचा दिग्गज कलाकार महेश मांजरेकर, जयवंत वाडकर आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री श्रुती मराठे लवकरच एका हॉलिवुड चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे अभिनेत्री श्रुती मराठे हिने लोकमत सीएनएक्सला सांगितले.          श्रुती सांगते, मला एका हॉलिवुड चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने खूपच आनंदी आहे. या हॉलिवुड चित्रपटात मुख्य भूमिकेत हॉलिवुडचा तगडा अभिनेता दिलीप राव आहे. यामुळे माझ्या आनंदाला चार चाँद लागले आहेत. या अभिनेत्याने अवतार, इन्सेप्शन असे मोठे चित्रपट केले आहेत. अशा या कलाकारासोबत काम करण्यास मिळणे हे माझे भाग्य आहे. तसेच दिलीपसोबत काम करताना त्याची कामाची पध्दत समजून घेणे हे माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. तसेच या चित्रपटामुळे हॉलिवुड चित्रपटाची काम करण्याची पद्धत ही कळाली.           त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्यासोबत या हॉलिवुड चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीचे तगडे कलाकार महेश मांजरेकर आणि जयवंत वाडकर असल्याने माझ्या आनंदाचा डबल धमाकाच म्हणावा लागेल. हा माझा पहिलाच हॉलिवुड चित्रपट आहे. या चित्रपटात बरेच इंडियन कलाकार आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. मात्र या चित्रपटाचे नाव अदयापतरी ठरले नाही. या चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. तसेच या चित्रपटाचे चित्रिकरण करताना खूपच छान आणि मस्त वाटलं. यापूर्वी श्रुती मराठे आणि महेश मांजरेकर बंध नायलॉनचे या चित्रपटात एकत्रित पाहायला मिळाले होते. आता थेट हॉलिवुडमध्ये एकत्रित दिसणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसाठी नक्कीच ही आनंदाची गोष्ट आहे.