Join us  

'नियम' व 'कुलूपबंद' लघुपटांची डिजिटल भरारी, ओटीटीवर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 8:07 PM

कोरोनाविषयक प्रबोधन करणाऱ्या आशिष निनगुरकर दिग्दर्शित लघुपटांनी डिजिटल भरारी घेतली आहे.

कोरोनाविषयक प्रबोधन करणाऱ्या आशिष निनगुरकर दिग्दर्शित लघुपटांनी डिजिटल भरारी घेतली आहे. 'नियम' व 'कुलूपबंद' या दोन कोरोविषयक जनजागृती करणाऱ्या लघुपटांना 'एअरटेल प्लेयर','हंगामा प्ले' व 'एम एक्स प्लेयर' या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाची संधी मिळाली आहे. 

आशिषने  घरात राहून 'कोरोना' विषयक सामाजिक संदेश देणाऱ्या "नियम व कुलूपबंद" या लघुपटांची निर्मिती केली.अत्यंत कमी वेळेत उत्कृष्ट सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटांची नोंद या अगोदर कॅनडाच्या 'वर्ल्ड ग्लोब' या संस्थेने घेतली होती व त्याचा अनोखा असा प्रीमियर टोरंटोमध्ये पार पडला होता.आशिष स्वतःच लेखक असल्याने त्याने या दोन्ही लघुपटांची मांडणी अत्यंत नेटकी केली असून योग्य आशय उत्तमरीत्या मांडला आहे. हा लघुपट घरात चित्रित करण्यात आल्याने कुणीही शुटिंगसाठी घराबाहेर पडले नाही. "एकत्र येण्याची नको घाई,पुन्हा हा जन्म नाही", 'नियम पाळा,कोरोना टाळा' व बाहेरच्या जिल्ह्यातून घरी आल्यावर 'क्वारंटाईन' म्हणून 'नियम' पाळणे बंधनकारक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 'सोशल डिस्टन्स' ठेवून सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. 'सुरक्षित अंतर पाळा,कोरोना संसर्ग टाळा' असा अनमोल संदेश या लघुपटांमधून देण्यात आला आहे.

"नियम व कुलूपबंद" या लघुपटांची निर्मिती 'काव्या ड्रीम मुव्हीज' अंतर्गत सौ.किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटांमध्ये अशोक निनगुरकर,जयश्री निनगुरकर,स्वरूप कासार व अनुराग निनगुरकर यांनी भूमिका साकारल्या आहेत.अभिषेक लगस यांनी या लघुपटांचे संकलन केले आहे. कॅमेरामन,संकल्पना,लेखन व दिग्दर्शन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे.

'वर्क फ्रॉम होम'च्या काळात  ग्रामीण भागातील हाडाच्या कलाकाराने घरात राहून सामाजिक आशय मांडणाऱ्या या लघुपटांना आता तुम्ही 'एअरटेल प्लेयर', 'हंगामा प्ले' व 'एम एक्स प्लेयर' या डिजिटल ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघू शकता.

टॅग्स :शॉर्ट फिल्म