निशिकांत कामत पहिल्यांदा झळकणार या मराठी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 12:17 IST
सध्या फुगे या मराठी चित्रपटाची चर्चा फारच रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असल्याचे दिसत ...
निशिकांत कामत पहिल्यांदा झळकणार या मराठी चित्रपटात
सध्या फुगे या मराठी चित्रपटाची चर्चा फारच रंगत असल्याची पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक असल्याचे दिसत आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी या तगडया कलाकारांचा समावेश आहे. आता या सर्व कलाकारांसोबत प्रेक्षकांना आणखी एक तगडा कलाकार पाहायला मिळणार आहे. हो, बॉलिवुडचे तगडे दिग्दर्शक निशिकांत कामतदेखील फुगे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ते खलनायकच्या भूमिकेत झळकणार आहे. हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. त्यामुळे त्यांची ही हटके भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही. निशिकांत कामत यांनी यापूर्वी डोंबिवली फास्ट, लय भारी या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे हे मराठी चित्रपटदेखील मोठया प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित फुगे या चित्रपटातील त्यांच्या या भूमिकेची सध्या चर्चा आहे. या चित्रपटात निशिकांत कामत गोव्यातील एका गाव गुंड्याची व्यक्तिरेखा साकारत असून, हा गुंड जितका रागीट आहे तितकाच प्रेमळ देखील आहे. या चित्रपटातील त्याचे डायलॉग्सदेखील प्रेक्षकांना वेड लावणारे ठरणार आहेत. एकच फाईट आणि वातावरण टाईटअशा धाटणीचे अनेक डायलॉग्स या भैरप्पाचे असल्यामुळे निशिकांत कामतचे हे आगळेवेगळे रूप रसिकांना नक्कीच आवडेल. तसेच या हटक्या भूमिकेच्या माध्यमातून निशिकांत पहिल्यांदाच विनोदी भूमिकेतून ते झळकणार आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बºहान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला फुगे हा चित्रपट आहे. १० फ्रेबुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आणखी थोडे दिवस या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.