Join us  

यंदा कर्तव्य आहे ! नव्या वर्षात हे मराठी कलाकार अडकणार लग्नबेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2021 1:34 PM

नव्या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीतील हे कलाकार विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत

२०२० वर्षे कोरोना व्हायरसमुळे सर्वांसाठी खूप आव्हानात्मक गेले. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकांना आपल्या प्लानिंग्सवर पाणी सोडावे लागले. तर कित्येकांना आपले लग्न पुढे ढकलावे लागले. तर काही सेलिब्रेटींनी वर्षांच्या अखेरीस लग्न आणि साखरपुडा आटपून घेतला. नुकतीच नव्या वर्षाला सुरूवात झाली आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील हे कलाकार विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. काहींनी आपल्या लग्नाच्या तारखा सोशल मीडियावर सांगितल्या आहेत. तर काहींचे केळवणचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.  

सोनाली कुलकर्णी- कुणाल बेनोडेकर: 

२०२०च्या फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा साखरपुडा पार पडला होता. लॉकडाउनच्या काळात सोनालीने ही खुशखबर आपल्या चाहत्यांना फोटो शेअर करत सोशल मीडियावर दिली. आता ही जोडी या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. 

मानसी नाईक –प्रदीप खरेरा:  

खरेतर अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा २०२०मध्ये लग्न करणार होते. मात्र कोरोनामुळे त्यांनी लग्न पुढे ढकलले आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला १९ जानेवारी हे दोघे विवाहबंधनात अडकणार आहे. १८ जानेवारीला मेहंदी आणि संगीत सेरेमनी पार पडणार आहे. लग्नाच्या दिवशी सकाळी हळदी समारंभ पार पडणार आहे. 

मिताली मयेकर – सिद्धार्थ चांदेकर: 

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांचा २५ जानेवारी, २०१९मध्ये साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाबद्दल उत्सुकता लागली होती. आता हे दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. ही जोडी सध्या केळवण एन्जॉय करताना दिसते आहे. 

अभिज्ञा भावे- मेहुल पै: 

अभिज्ञा भावेचा मेहूल पैसोबत ऑक्टोबरमध्ये साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर आता अभिज्ञा यावर्षी मेहुलसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या ही जोडी केळवण एन्जॉय करताना दिसते.  

टॅग्स :सोनाली कुलकर्णीअभिज्ञा भावेमानसी नाईकसिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर