Join us  

नवोदित दिग्दर्शक मला सिनेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देतात - सई ताम्हणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 7:15 AM

नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अॅप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या याच दृष्टीकोनामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरला त्याच साचेबद्ध कामात अडकून न राहता काही तरी हटके करायच्या शोधात असते. यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसतेय. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री क्वचितच असे, एक्सपरिमेन्ट करताना दिसत असतात, सई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना सपोर्ट करते.आणि ह्याचं लेटेस्ट उदाहरण म्हणजे उपेन्द्र सिधये आणि मोहित टाकळकर.

लवकरच दोन नवीन फिल्ममेकर्ससोबत सईचे सिनेमे केले आहेत. गर्लफ्रेंड सिनेमातून सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणा-या उपेंद्र सिधये आणि मिडीयम स्पाईसी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणा-या मोहित टाकळकरसोबत काम करण्याचा निर्णय सईने घेतला. पण नव्या फिल्ममेकर्ससोबत सई ताम्हणकर पहिल्यांदाच सिनेमा करत नाही आहे. याअगोदरही सईने मनवा नाईक (पोर बाजार), हर्षवर्धन कुलकर्णी (हंटर),  गिरीश कुलकर्णी (जाऊ द्या ना बाळासाहेब), दिपक भागवत (3.56 किल्लारी),  ज्ञानेश झोटिंग (राक्षस), अशा फस्ट-टाइम दिग्दर्शकांच्या सिनेमांतून काम केले आहे.

आपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरे जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते. जेव्हा जेव्हा ती फस्ट-टाईम दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वत: पहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे जी स्पोर्ट्स टीमची ओनर आहे. ती पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे जी स्टँडअप कॉमेडी करते. तिला नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अॅप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या याच दृष्टीकोनामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. 

सई ह्याविषयी म्हणते, “नव्या दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगचा एक नवा दृष्टिकोन आणि फ्रेशनेस असतो. सिनेमा बनवतानाच्या नव्या दिग्दर्शकांच्या अॅप्रोचला अभिनेत्री म्हणून मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मी आपसूकच स्वत:ला आव्हान देत असते.कलाकार म्हणून समृद्ध व्हायचं असेल तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं असं मला वाटतं. 

टॅग्स :सई ताम्हणकर