Join us  

"नेबर्स " चित्रपटाचे पोस्टर आले समोर, या कलाकारांच्या आहेत भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 7:15 AM

या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  

दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.  

अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करीत असलेल्या रोशन या तरुण अभिनेत्याच्या जीवनात एका घटनेने अचानक वादळ निर्माण होते. त्याच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये राह्यला आलेली प्रेरणा या तरुणीचे वागणे परग्रहावरून आलेल्या 'एलिन' सारखे बरेचसे विचित्र आणि गूढरम्य असते. अमित या आपल्या जिवलग मित्राला रोशन प्रेरणाविषयी तसे सांगतो मात्र अमित ती गोष्ट हसण्यावारी नेतो. त्याचवेळी प्रेरणाचा मित्र असलेला डॉ. अंकुर हा तरुण शास्त्रज्ञ हाही तेथे येतो. त्याला परग्रहावरील माणसाचे संशोधन करण्यात रस असतो.  

त्याची आणि प्रेरणाची जवळीक प्रेरणावर प्रेम करीत असलेल्या रोशनला सहन होत नाही. त्यामुळे अमितच्या सांगण्यावरून रोशनही परग्रहावरून आलेल्या माणसासारखे विचित्र वागण्याचे नाटक करू लागतो. त्याच्या गूढरम्य वागण्याचा शेवट कसा होतो? प्रेरणाची आणि त्याची खरी ओळख कशी होती आणि प्रेरणाचे आणि त्याचे प्रेम यशस्वी होते की  नाही? याचा  गूढरम्य प्रवास या चित्रपटात पाह्यला मिळणार आहे. येत्या २० मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर छायालेखनाची  महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद स्टोरी यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे.