Join us

नेहाने केला कास्टींग काऊचचा सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2016 15:29 IST

    priyanka londhe               अभिनेत्री नेहा पेंडसे मराठीच काय तर साऊथ आणि बॉलिवूड ...

    priyanka londhe               अभिनेत्री नेहा पेंडसे मराठीच काय तर साऊथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये देखील जम बसवून आहे. नेहाने मराठी बरोबरच अनेक साऊथ चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिकेत काम केले आहे. सध्या ती आपल्याला एका हिंदी टिव्ही शो मध्ये देखील दिसत आहे. परंतू नेहाला चित्रपटसृष्टीत काम करताना, अनेक जणांकडुन कास्टींग काऊचची आॅफर आली आहे. या गोष्टीचा खुलासा नेहाने स्वत: लोकमत सीएनएक्सशी बोलताना केला आहे. नेहा सांगतेय होय, ही गोष्ट खरी आहे. मला अनेकांनी कास्टींग काऊच साठी विचारले होते. माझे फिल्मी बॅकग्राऊंड नसल्याने या गोष्टींचा मला सामना करावा लागला आहे. त्यामुळे मी ज्या लोकांसोबत काम करताना कम्फर्टेबल असते अशाच लोकांसोबत मी चित्रपट करते.  मी अतिशय सुरुवाती पासून कास्टींग काऊचला तोंड देत आलीय. या गोष्टी आधी पण होत्या आणि आता पण आहेत. मराठी मधुन मला कधीच या गोष्टींची आॅफर आली नाही. परंतू साऊथ इंडस्ट्री आणि हिंदी मध्ये काम शोधताना मला सतत कास्टींग काऊचसाठी विचारण्यात आले आहे. मी नेहमीच या गोष्टीला विरोध करुन पुढे गेले आहे.  कास्टींग काऊचला स्वीकारणे किंवा नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्या मुलींनी हे केलेय त्या चुकिच्या आणि ज्यांनी केले नाही त्या बरोबर असे माझे बिलकुलच म्हणणे नाही. कास्टींगच्या आॅफरची पॉझिटिव्ह बाजू न बघता  निगेटीव्ह बाजू देखील असते, ती तुम्हाला कधीच सांगितली जात नाही. ती नंतर तुमच्या समोर येते. त्यामुळे या गोष्टीचा व्यवस्थित विचार करणे गरजेचे आहे. तुम्हाला या गोष्टीला सामोरे जरी जायचे असेल तरी विचार करुनच जा कारण नंतर मग डिप्रेशनमध्ये जाण्याची वेळ देखील येऊ शकते. एवढेच मी इंडस्ट्रीत नवीन येण्याºया मुलींसाठी सांगू शकते. चंदेरी दुनियेच्या या झगमगाटात येण्यासाठी मुली धडपडत असतात. परंतू नेहाचा अनुभव पाहिला तर नक्कीच मुलींनी या जादुई दुनियेत जरा जपूनच पाऊल टाकलेले बरे.