Join us  

नेहा पेंडसे पेक्षा सुंदर आहे तिच्या नव-याची दुसरी बायको, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 12:36 PM

व्हायरल झालेला हा फोटो दुसरी पत्नी अनिता अग्रवालचा आहे. अनिता आणि शार्दुलच्या दोन मुली असून आलिया आणि रिया असे यांची नाव आहेत.

नेहा पेंडसेने 5 जानेवारीला शार्दुल बयाससोबत लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली आहे. मात्र लग्नाच्या दुस-याच दिवशी शार्दुलबद्दल काही गोष्टी समोर आल्या. शार्दुलचं हे तिसरं लग्न असून त्याला दोन मुलीही आहेत. याबद्दल जेव्हा नेहाला विचारण्यात आले तेव्हा तिने सर्व माहीत असल्याचे सांगितले. नेहा म्हणाली की, 'मी आधीच सांगितलं की शार्दुलबद्दल मला सगळं माहीत आहे. हे त्याचं तिसरं लग्न आहे आणि त्याला दोन गोड मुली आहेत.'  शार्दुलचे जरी याआधी दोन लग्न झाली असली तरी त्याचा जीवनाचा दृष्टीकोन बदललेला नाही. 

शार्दुलने सर्वकाही व्यवस्थित संतुलित केले आहे. '' तर नेहा देखील  लग्नापूर्वी दोन ते तीन रिलेशनशिपमध्ये होती. नेहाच्या लग्नानंतर आता शार्दुलच्या पहिल्या पत्नीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शार्दुलच्या पहिल्या पत्नीचे नाव नेहा बोरा होते तर दुसरी पत्नी अनिता अग्रवाल होती. काही कारणामुळे शार्दुलचे दोन्ही लग्न फार काळ काही टिकले नाही.  तुर्तास व्हायरल झालेला हा फोटो दुसरी पत्नी अनिता अग्रवालचा आहे. अनिता आणि शार्दुलच्या दोन मुली असून आलिया आणि रिया असे यांची नाव आहेत.2017 मध्ये शार्दुलने अनिताला घटस्फोट देत त्यांच्या नात्याला पूर्णविराम दिला. 

लग्नात नेहाने फिकट गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती. नाकात पारंपरिक मोठी नथ, चंद्रकोर, हिरवा चुडा आणि केसांत गजरा यांमुळे नेहाचा लुक खुलून दिसत होता.नेहाने सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो फॅन्ससोबत शेअर केले होते. नेहाने लग्नात घेतला उखाणा देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  लग्नाच्या एक दिवस अगोदर नेहाचा साखरपुडा झाला. तिथेच संगीत सेरेमनीमध्येही नेहा आणि शार्दुलने मस्ती केली. या दोन्ही फंक्शनचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

टॅग्स :नेहा पेंडसे