Join us  

नवरात्री निमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीचं खास फोटोशूट, वेधल सर्वांच लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2021 10:51 AM

नवरात्रीनिमित्त खास नारीशक्तीचा जागर करणारे फोटोशूट अपूर्वा नेमलेकरने केले आहे.

नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. दरवर्षी सेलिब्रेटीमंडळी नवरात्रीच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा संदेश देणारे फोटोशूट करताना दिसतात. या दिवसांत वेगवेगळ्या देवींचे रूप साकारत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. देवी रूपाच्या माध्यमातून समाजातल्या आणि जगातल्या काही महत्त्वांच्या मुद्दय़ांकडे, एक माणूस म्हणून आपण करत असलेल्या चुकांकडे लक्ष वेधण्यासाठी हा प्रयत्न असतो. विविध मार्गांनी महिलांच्या कलागुणांना, त्यांच्यातील ताकदीला सलाम करण्यासाठी कलाकार मंडळी पुढे सरसावताना दिसतात. यंदा या साऱ्यामध्ये सर्वात लक्षवेधी ठरतेय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.नवरात्रीनिमित्त खास नारीशक्तीचा जागर करणारे फोटोशूट तिने केले आहे.

पहिली माळ म्हणजे पहिल्या दिवशी अपूर्वाने महालक्ष्मी (अंबाबाई) देवीचे रुप साकारत फोटोशूट केले आहे. विशेष म्हणजे देवीच्या वेगवेगळ्या रुपातले फोटो शेअर करताना देवस्थानाचं महत्त्वही तिने शेअर केले आहे. पहिला दिवशी फोटोशेअर करत तिने म्हटले की, कोल्हापूर नगरातील श्री महालक्ष्मी मंदिर हे ५२ शक्तिपीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या पीठाचा उल्लेख पुराणांमध्ये आढळून येतो.कोल्हापूर देवी महालक्ष्मी व अंबाबाई म्हणून ओळखले जाते.

आजचा दुसरा दिवस म्हणजचे दुसरी माळ, म्हणूनच अपूर्वाने  तिचा दुसरा लूक शेअर केला आहे. मुंबादेवी मुंबईची ग्रामदेवताच्या रुपातला तिने फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले की,नवरात्रीचा दुसरा दिवस ! रंग - हिरवा ! देवी- मुंबादेवी, मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता 🙏🙏 मुंबादेवी मंदिर सहा शतके जुने आहे. मुंबादेवी या देवीच्या नावावरुन शहराला मुंबई हे नाव पडले. मंदिराची स्थापना सर्वात आधी मूळ मुंबईकर असलेल्या मच्छीमारांनी (कोळी बांधव) केली. मुंबादेवी, सर्व संकटात मुंबईचे रक्षण करते अशी भावना आहे.🙏🙏मी अणि माझ्या टीमने केलेला ऐक प्रामाणिक प्रयत्न. नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतदेखील अशाच प्रकारे नारीशक्तीचा जागर करणारे नवदुर्गाच्या रुपात फोटोशूट करत असते. गेल्या काही वर्षापासून सातत्याने फोटोशूट करत याद्वारे संदेश देण्याचा ती प्रयत्न करत असते. गेल्यावर्षी कोरोनाने माजवलेला हाहाकार या काळात कोरोना वॉरिअर्स डॉक्टर्स, नर्स आणि पोलिस, सफाई कर्माचारी या सगळ्यांचे तिने आभार मानले होते. या फोटोशूटची सगळ्यात जास्त कौतुक झाले होते. आता अगदी त्याचप्रकारे अपूर्वासुद्धा असाच प्रयत्न करताना दिसत आहे. 

 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरतेजस्विनी पंडित