Join us  

Navratri 2018: तेजस्विनी पंडीतने कालिका अवतारात फोटो केला शेअर, व्यक्त केली मनातील तगमग !

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 4:40 PM

तेजस्विनीच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचा भाव पाहायला मिळत आहे.याशिवाय फोटोमधील लूकही तितकाच वेगळा आहे. गळ्यात रूद्राक्ष माळा परिधान केलेला कालिका अवतारात असलेल्या फोटोंमध्ये तेजस्विनी नारीशक्ती विषयी संदेश देत असल्याचे पाहायला मिळत आहे.

'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमातील भूमिका असो किंवा मग '100 डेज' मालिकेतील ग्लॅमरस भूमिका असो प्रत्येक भूमिकेला तेजस्विनीनं न्याय दिला. संवेदनशील अभिनय, ग्लॅमरस अदा आणि सौंदर्य यामुळे तेजस्विनी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री असलेल्या तेजस्विनीने स्वतःचा फॅशन ब्रँडही लॉन्च केला. त्यामुळे अभिनेत्री ते उद्योजिका असा प्रवास तिने यशस्वीरित्या पार केला आहे. 

तेजस्विनी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सध्या सोशल मीडियावर चाहते तेजस्विनीच्या प्रत्येक फोटोला लाईक्स आणि कमेंटस देताना दिसतात. उत्तम अभिनेत्री असलेली तेजस्विनी माणूस म्हणूनही संवेदनशील आहे. त्यामुळे समाजात घडणा-या विविध घटनांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून तेजस्विनी आपल्या भावना व्यक्त करत असते. सध्या सोशल मीडियावर तेजस्विनीचे काही फोटो चर्चेचा विषय ठरले आहेत. या फोटोत तेजस्विनीचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तिचे हे दोन्ही फोटो बरेच बोलके आहेत. तेजस्विनीच्या डोळ्यात वेगळ्याच प्रकारचा भाव पाहायला मिळत आहे. याशिवाय फोटोमधील लूकही तितकाच वेगळा आहे. गळ्यात रूद्राक्ष माळा परिधान केलेला  कालिका अवतारात असलेल्या फोटोंमध्ये तेजस्विनी नारीशक्ती विषयी संदेश देत असल्याचे पाहायला मिळत आहे.शिव अवतारात म्हणजे शैलपुत्रीदेवीच्या रूपात ती पाहायला मिळत आहे.नवरात्रीचा पहिला दिवस निळा रंग असल्यामुळे तेजस्विनीच्या फोटोत ही तिचा चेहरा पूर्ण निळ्या रंगातच रंगल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच नवरात्रीच्या नऊ दिवस तेजस्विनी अशाच अंदाजात समोर येणार आहे.

गेल्यावर्षी नवरात्रौत्सवात तेजस्विनीने अशाच प्रकारे उपक्रम हाती घेतला होता. बलात्कार पीडितेला हा समाज माणूस म्हणून स्वीकारत नाही. आजही मुलींच्या शिक्षणापेक्षा त्यांच्या लग्नावर अधिक खर्च केला जातो” अशी पोस्ट तिने तिच्या फोटोसह पोस्ट केली होती. हे फोटो आणि पोस्ट यामुळे संवदेनशील अभिनेत्री असलेली तेजस्विनी प्रत्यक्ष जीवनात माणूस म्हणून तितकीच संवेदनशील असल्याचे पाहायला मिळाले होते. समाजात महिला अत्याचाराच्या विशेषतः बलात्काराच्या दिवसागणिक वेगवेगळ्या बातम्या कानावर पडत आहेत. यांत अल्पवयीन मुली आणि तरुणींवरील बलात्काराच्या घटना तर सुन्न करुन टाकतात. कायदा कितीही कठोर झाला तरी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे अन्यथा कित्येक निर्भयांचं आयुष्य उद्धवस्त होईल अशीच भीती तेजस्विनीच्या या फोटो आणि पोस्टमधून व्यक्त केली होती.   

 

टॅग्स :तेजस्विनी पंडित