Join us

नाना पाटेकर विथ कपिल देव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 14:21 IST

आपआपल्या क्षेत्रात हे दोघे ही तरबेज आहेत. एक चित्रपटसृष्टीत तर दुसरा क्रिकेट मध्ये अव्वल आहे. दोघांचे ही चाहते त्यांच्यावर ...

आपआपल्या क्षेत्रात हे दोघे ही तरबेज आहेत. एक चित्रपटसृष्टीत तर दुसरा क्रिकेट मध्ये अव्वल आहे. दोघांचे ही चाहते त्यांच्यावर जिवापाड प्रेम करतात. ज्यावेळी असे दोन प्रेक्षकांचे लाडके आयडल  एकत्रित येतात. त्यावेळी क्लिक झालेला त्या दोघांचा तो फोटो, तो क्षण त्यांच्या चाहत्यांसाठी खरंच आनंददायी असतो. हे  दोघे म्हणजे प्रेक्षकांचे लाडके नाना पाटेकर व आपल्या खेळाने संपूर्ण जगाला वेड लावणारे कपिल देव. या दोन सुपरहिट व्यक्तींचा एक  फोटो सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या दोघांच्या फोटोंना सोशलमिडीयावर भरभरून लाइक्स मिळताना देखील दिसत आहे. पण हे दोघे कसे एकत्रित आले हा प्रश्न प्रत्येकालाच पडला असेल? पण जास्त विचार करू नका. हे दोन स्टार व्यक्तीमहत्व कोणत्या चित्रपटाच्या निमित्ताने वगैरे एकत्रित आले नाहीत. तर एका कार्यक्रमावेळी या दोघांची भेट कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या फोटोमध्ये नाना पाटेकर व कपिल देव हे दोघे ही एकमेकांसोबत फोटो काढताना एकदम उत्सुक दिसत आहे. असो, पण अशा दोन सुपर स्टार असलेले लोक एका कॅमेरात कैद होणारे क्षण तसे दुर्मिळच असतात.