Join us  

नम्रता आवटे झळकणार ह्या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 5:40 PM

अभिनेत्री नम्रता आवटे 'सलमान सोसायटी' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील कलंबोळी येथे करण्यात आले.

ठळक मुद्दे 'सलमान सोसायटी' हा चित्रपट बालशिक्षणावर आधारित नम्रता आवटेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात

चित्रपटात आपल्या अभिनयाने व कॉमेडी रिएलिटी शोमध्ये आपल्या विनोदी कौशल्याने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री नम्रता आवटे 'सलमान सोसायटी' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतील कलंबोळी येथे करण्यात आले. 'पार्टी दणाणली' असे या गाण्याचे बोल असून पुष्कर लोणारकर, शुभम मोरे ,विनायक पोतदार आणि गौरव मोरेयांच्यावर हे विशेष गाणे चित्रीत करण्यात आले. तसेच अभिनेत्री नम्रता आवटे देखील पार्टी दणाणलीवर थिरकताना दिसली.  

'सलमान सोसायटी' चित्रपटाचे दिग्दर्शन कैलाश काशीनाथ पवार व निर्मिती दशरथ राजेंद्र यादव, रेखा सुरेंद्र जगताप, संपतराव पाटील व शांताराम भोंडवे सोबत प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत होत आहे . 'सलमान सोसायटी' हा चित्रपट बालशिक्षणावर आधारित असून 'पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया' ह्या टॅगलाईनवर आधारीत आहे. या चित्रपटात बाळकडू आणि काही दिवसां पूर्वी  प्रदर्शित झालेला गावठी आणि हिंदी चित्रपट संजू मधे ही  आपल्या अभिनयाने  सर्वाना प्रभावित करणारे गौरव मोरे आगामी चित्रपट सलमान सोसायटी मध्ये एका वेगळ्या पण महत्वपूर्ण भूमिकेत दिसेल. तसेच ह्या चित्रपटात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार  ही प्रसिद्ध बच्चे कंपनी मुख्य भूमिकेत असणार आहेत. या बच्चे कंपनीसोबत अभिनेत्री नम्रता आवटे या चित्रपटात दिसणार आहे. मात्र ती कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप समजू शकलेले नाही. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, नवी मुंबईच्या जवळील भागात होणार आहे. तसेच हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित करण्याचा मानस निर्मात्यांचा आहे.