Join us  

‘सैराट’नंतर पुन्हा जमणार नागराज मंजुळे-आकाश ठोसरची जोडी, नव्या सिनेमाचा टीझर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 2:31 PM

Nagraj Manjule Akash Thosar's film : सैराट, फँड्री, नाळ हे सिनेमे हिट झालेत. त्यानंतर नागराज मंजुळेंच्या नव्या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत होते. आता ही प्रतीक्षा संपत आली आहे.  

ठळक मुद्देअभिनेते सयाजी शिंदे यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  

‘सैराट’ हा गाजलेला सिनेमा. नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) या सिनेमानं अख्ख्या महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावलं. चित्रपटातील परश्या आणि आर्चीची जोडी तर सुपरहिट झाली. परश्या अर्थात आकाश ठोसर (Akash Thosar)आणि आर्ची म्हणजे रिंकु राजगुरू आज कुठल्या कुठे पोहोचलेत, ते ‘सैराट’च्याच जोरावर. आता नागराज मंजुळे यांनी एका नव्या सिनेमाची तयारी सुरू केलीये आणि या सिनेमाच्या निमित्तानं नागराज आणि आकाश ठोसर ही जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहे.नागराज मंजुळे यांचे सैराट, फँड्री, नाळ हे सिनेमे हिट झालेत. त्यानंतर त्यांच्या नव्या चित्रपटाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत  होते. आता ही प्रतीक्षा संपत आली आहे.  लागोपाठ तीन हिट सिनेमे दिल्यानंतर नागराज मंजुळे आपला आणखी एक हटके सिनेमा घेऊन येत आहेत. घर बंदूक बिरयानी (Ghar banduk biryani) असं या चित्रपटाचं नाव. सिनेमाचं नावच इतकं सॉलिड आहे, की आता या फिल्मची उत्सुकता वाढली आहे.

होय, दस-याच्या दिवशी नागराज मंजुळे यांनी आपल्या या नव्या सिनेमाची घोषणा केली. या चित्रपटाचा पहिला टीझर लॉन्च झाला आणि यात आकाश ठोसर दिसणार म्हटल्यावर चाहत्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. नागराज मंजुळेच्या आटपाट प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या सिनेमात आकाश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आकाशने सिनेमाचा टीझर त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.  नागराज मंजुळेही या फिल्ममध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत अवताडे यांनी लिहिली आहे. ए.व्ही.प्रफुलचंद्र यांनी संगीत दिलं आहे.

टॅग्स :आकाश ठोसरनागराज मंजुळे