Join us  

‘तेरे बिन’ गाण्यासह ट्रॉय-आरिफ संगीतकार जोडीचे पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2020 5:18 PM

आतापर्यंत त्यांनी ‘माऊली’, ‘क्लासमेट्स’, ‘हाफ तिकीट’ आणि ‘दिल दिया गल्ला’सारख्या चित्रपटांचा संगीत दिले आहे.

अभिनेता परमिश वर्मा आणि अभिनेत्री सोनम बाजवा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘जिंदे मेरीये’ या पंजाबी चित्रपटासाठी ‘तेरे बिन’ हे गाण घेऊन येत ट्रॉय आणि आरिफने दिमाख्यात पुनरागमन केलं आहे. हे गाणं तरुणाईच्या मनाला भिडेल अशी दोघांनाही खात्री आहे. 

गाना. कॉम, जियो सावन, अॅमेझॉन प्राईम म्युजिक, स्पोटीफाय आणि विंक यांसारख्या विविध संगीत माध्यमांमार्फत हे गाणं चाहत्यांसाठी उपलब्ध होईल. दोन्ही संगीतकारांच्या या गाण्याची पंजाबी संगीत रसिकांना मोठी आतुरता होती आणि त्यांच्यापर्यंत हे गाणं प्रत्येक माध्यमातून पोहोचवण्याचं निर्मात्याच उद्दिष्ट आहे.

यापूर्वी, ट्रॉय आणि आरिफ या दोघांनीही सुपरहिट ठरलेल्या अनेक मराठी आणि पंजाबी चित्रपटांतून संगीतकार म्हणून प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ज्यामध्ये ‘साजन सिंग रंगरुत’, ‘माऊली’, ‘क्लासमेट्स’, ‘हाफ तिकीट’ आणि ‘दिल दिया गल्ला’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या या यशस्वी संगीत प्रवासाची घौडदौड इतक्या वेगाने सुरु आहे कि येत्या काही काळात ट्रॉय आणि आरिफ या नावांनी अख्ख्या भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवलं तर नवल वाटू नये.

हे गाणं कसं तयार झालं या बद्दल सांगताना ट्रॉय म्हणाला, “ आम्हाला ‘तेरे बिन’ हे गाणं कधी एकदा जगापुढे येतंय याची आतुरता लागली आहे आणि दिग्दर्शक पंकज बत्रा याने सुद्धा आम्हाला या कामात खूप साथ दिली. आम्हा सर्वांचं ध्येय एकच होतं कि हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयाला भिडलं पाहिजे आणि मला आशा आहे कि गाणं ऐकताना रसिकांनाही तसचं वाटेल. येत्या काही काळात फक्त प्रादेशिक संगीतावर भर न देता बॉलीवूड साठीही गाणी तयार करण्याची आमची इच्छा आहे.”

याबद्दल अधिक बोलताना आरिफ म्हणाला, “पंजाबी संगीत क्षेत्र हे अतिप्रचंड आहे आणि सबस्क्रायबर, व्ह्यूज व लोकांचा प्रतिसाद पाहता ऑनलाईन जगतात सध्या पंजाबी संगीताचा मोठा दबदबा आहे. आम्हाला या गाण्याकडून खूप आशा आहेत आणि या गाण्याच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण भारतभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचू असा विश्वास वाटतो. 

टॅग्स :माऊली