Join us  

या चित्रपटातून मृणाल कुलकर्णी यांचा पुत्र विराजस कुलकर्णी करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 10:19 AM

प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा अगदी लहानपणापासूनच चित्रपट जगला आहे. सुरुवातीपासूनच तो चित्रपटाच्या वातावरणात वावरला ...

प्रख्यात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णी हा अगदी लहानपणापासूनच चित्रपट जगला आहे. सुरुवातीपासूनच तो चित्रपटाच्या वातावरणात वावरला आहे. रंगभूमी आणि चित्रपटामध्ये पदवी घेतलेल्या विराजस कुलकर्णीसाठी मोठा झाल्यावर याच क्षेत्रात करियर करणे मग स्वभाविकच होते. प्रख्यात दिग्दर्शक अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’मध्ये तो अभिनयात पदार्पण करत आहे. चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, अक्षय टाकसाळे आणि संजय जाधव यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.संहिता लेखन आणि पडदा लेखनामध्ये विराजस कुलकर्णी प्रशिक्षण घेतले असून या दोन्ही बाबतीत तो नवीन प्रकल्प स्वीकारताना काळजी घेतो. त्याचे असे म्हणणे आहे की, अजय नाईक यांचा चित्रपटाकडे पाहण्याचा जो दृष्टीकोन आहे त्यामुळे त्याने त्यांच्या चित्रपटात पदार्पण करण्याचे ठरवले. अजय हे मनाने एक संगीतकार आहेत आणि त्यामुळे ते चित्रपटाकडे त्याच पद्धतीने पाहतात. ते चित्रपटाकडे एका गाण्याप्रमाणे बघतात. त्याचा पाया तयार करतात आणि त्यावर मग थर रचत जातात. ही सर्व प्रक्रिया मला खूपच रंजक वाटते, असेही विराजस म्हणतो.१९९०चे दशक हे मधुर गाण्यांसाठीही ओळखले जाते आणि त्याचमुळे या दशकाला जागणारा ‘हॉस्टेल डेज’ हा एक सांगीतिक चित्रपट आहे. या चित्रपटात एकूण आठ मधुर गाणी आहेत आणि ती आघाडीच्या बॉलीवूड गायकांनी गायली आहेत. सोनू निगम, कुमार सानू, शंकर महादेवन, शान, कुणाल गांजावाला, अवधूत गुप्ते, बेला शेंडे  त्यांच्याबरोबर मराठीतील आघाडीचे गायक प्रियांका बर्वे, आनंदी जोशी आणि रुचा बोंद्रे यांनीही यातील गाणी गायली आहेत.ALSO READ :  'हॉस्टेल डेज' १२ जानेवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

२२ वर्षांच्या विराजसने अभिनयाचा वारसा आपल्या आईकडून घेतला आहे. तो अभिनयाबरोबरच दिग्दर्शनही करतो. ‘रमा माधव’ या मृणाल कुलकर्णी यांच्या दिग्दर्शकिय पदार्पणात त्याने आपल्या आईला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. मृणाल कुलकर्णी अभिमानाने म्हणतात, “तांत्रिकदृष्ट्या पहिले तर तो माझ्याआधीच स्वतंत्र दिग्दर्शक झाला होता. मी ‘रमा माधव’ बनविण्यापुर्वीच त्याने ‘अनाथेमा’ या त्याच्या पहिल्या नाटकाचे दिग्दर्शन केले होते आणि त्यात अभिनयही केला होता. मला आनंद आहे की त्याने त्याच्या कारकीर्दीचा निर्णय स्वतः घेतला. त्याने यात यश मिळवावे अशी मनोमन इच्छा आहे.”विराजस आपल्या कामाबद्दल आपल्या आईबरोबर चर्चा करतो. चित्रपट स्वीकारल्यानंतर त्याबद्दल मी माझ्या आईशी चर्चा केली. तिने मला काही महत्वाच्या गोष्टींचा कानमंत्र दिला. तिचा अनुभव आणि सिनेमाविषयी असलेले तिचे ज्ञान यांच्या आधारे निर्णय घेतल्याने आता मी चूक करू शकत नाही, असेही तो म्हणतो.