Join us  

मृणाल कुलकर्णी म्हणतेय, 'वेलकम होम', पहा हा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 6:30 AM

'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरेही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला.

'घर म्हणजे काय', 'माझं घर म्हणजे काय', 'आपली माणसं म्हणजे काय' हे आणि असे अनेक प्रश्न विचारत त्याची उत्तरेही देणाऱ्या 'वेलकम होम' या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट १४ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या ट्रेलरमुळे आता चित्रपटांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 

'वेलकम होम' चित्रपटाची निर्मिती अभिषेक सुनील फडतरे, विनय बेळे, अश्विनी सिधवानी, दीपक कुमार भगत यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन सुमित्रा भावे यांचे असून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी दिग्दर्शन केले आहे. पार्थ उमराणी यांनी संगीत, सुनील सुकथनकर यांनी गीतलेखन, मोहित टाकळकर यांनी संकलन, धनंजय कुलकर्णी यांनी छायांकन, तृप्ती चव्हाण यांनी कला दिग्दर्शन, साकेत कानेटकरनं पार्श्वसंगीत केले आहे. 

'वेलकम होम' या चित्रपटात मृणाल कुलकर्णीसह सुमित राघवन, स्पृहा जोशी, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, डॉ. मोहन आगाशे, उत्तरा बावकर, सेवा चौहान, सिद्धार्थ मेनन, मिलिंद फाटक, इरावती हर्षे, दीपा श्रीराम, अश्विनी गिरी, रेणुका दफ्तरदार, श्रुती अत्रे, शाल्व किंजवडेकर, प्रांजली श्रीकांत अशी उत्तम कलाकार आहे.

उत्तम आणि आशय संपन्न कथानकाला नेत्रसुखद दृश्य, श्रवणीय संगीत, संयत आणि सकस अभिनयाची जोड मिळाल्याचे या ट्रेलरमधून पहायला मिळते. आजवर सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी अनेक चित्रपट केले असले, तरी हा चित्रपटाची जातकुळी काहीशी वेगळी असल्याचे या ट्रेलरवरून जाणवते. त्यामुळेच या चित्रपटाविषयी कुतुहल निर्माण होते. 

टॅग्स :मृणाल कुलकर्णीसुमीत राघवन