Join us  

नो मेकअप लूकनंतर लॉकडाऊनमध्ये या मराठी अभिनेत्रीचा हॉट योगा होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 11:40 AM

सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते.

जगभरात कोरोनाच्या थैमानामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. देशात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे. सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात आहेत.  अभिनेत्री मिथिला पालकरही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधत असते. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. मात्र यावेळी मिथिलाने योगासन करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आतापर्यंत या फोटोला जवळपास 2 लाख 91 हजाराहुन अधिक लाईक्स आले आहेत. लाईक्ससोबत कमेंट्सचा वर्षावदेखील करण्यात आला आहे. 

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

टॅग्स :मिथिला पालकर