Join us  

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला तिचा सुपरहॉट फोटो, अवघ्या काही तासांतच मिळाले फोटोला 4 लाखाहून अधिक लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 11:02 AM

तिचा हा हॉट फोटो पाहून सेलिब्रेटींनीही यावर कमेंट्स केल्या आहेत.

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते.

सिने इंडस्ट्रीत एक उत्तम अभिनेत्री असल्याचे सिद्ध करणारी मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात ती यशस्वी ठरत आहे.

मिथिलाने तिचा ब्लॉक रंगाच्या हॉट ड्रेसमधला फोटो शेअर केला आहे.  या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिथिलाहा हा फोटो काहीसा वेगळा ठरतो आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. आतापर्यंत या फोटोवर 4 लाखांच्यावर लाईक्स मिळाले आहेत. 

आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

टॅग्स :मिथिला पालकर