Join us

मयूरेश पेमला करायच्या आहेत अ‍ॅक्शन असणाºया वेबसीरीज, लघुपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2017 14:19 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टी वेबसीरीजच्या प्रेमात बुडालेली पाहायला मिळत आहेत. अमेय वाघ, संतोष जुवेकर, पुष्कराज चिरपुटकर, गौरी नलावडे, पर्ण पेठे ...

सध्या मराठी चित्रपटसृष्टी वेबसीरीजच्या प्रेमात बुडालेली पाहायला मिळत आहेत. अमेय वाघ, संतोष जुवेकर, पुष्कराज चिरपुटकर, गौरी नलावडे, पर्ण पेठे यांच्यापाठोपाठ आता अभिनेता मयूरेश पेमला ही वेबसीरीजमध्ये झळकायचं आहे. मात्र त्याला आता या सर्व वेबसीरीजपेक्षा वेगळया आणि हटके वेबसीरीज करायची असल्याचे त्याने लोकमत सीएनएक्सला सांगितले.          मयूरेश सांगतो, मराठी चित्रपटसृष्टीत कॉमेडी आणि कौंटूबिक चित्रपट मोठया प्रमाणात पाहायला मिळतात. मात्र हॉलिवुड टाइप अ‍ॅक्शन असणारे चित्रपटांची तशी कमतरताच पाहायला मिळते. म्हणूनच मला असे अ‍ॅक्शन पट भूमिका मराठी इडस्ट्रीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मात्र या सर्वाची सुरूवात मी वेबसीरीज या लघुपटाच्या माध्यमातून करणार आहे. त्यासाठी माझे प्रयत्नदेखील सुरू आहेत. आता सध्या वेबसीरीज करायचे म्हटले तर, कॉलेजमध्ये मुलांच्या परिक्षा सुरू आहेत. त्यामुळे चित्रिकरणास परवानगी मिळत नाही. त्यामुळे परिक्षेचा हा हंगामा संपला की, नक्कीच वेबसीरीज करणार असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले.            मयूरेशने याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. नुकताच त्याचा झाला बोभाटा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात तो  दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत या कलाकारांसोबत पाहायला मिळाला. तसेच सध्या या चित्रपटातील मयूरेश आणि मोनालिसा बागल यांच्यावर चित्रिकरण करण्यात आलेले पैजण हे गाणे मोठया प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. त्याचबरोबर तो आता महेश मांजरेकर यांच्या आगामी चित्रपटातदेखील पाहायला मिळणार आहे. एफयू असे या चित्रपटाचे नाव आहे.