Join us  

अस्खलित उर्दू उच्चारणासाठी मेघना गुलजारने अमृता खानविलकरचे केले कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 6:40 AM

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ ह्या सिनेमात दिसणार आहे.‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही ...

अभिनेत्री अमृता खानविलकर लवकरच धर्मा प्रॉडक्शन निर्मित आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ ह्या सिनेमात दिसणार आहे.‘राजी’ चित्रपटात पाकिस्तानी शाही कुटूंबातल्या मुनिरा ह्या गृहिणीच्या भूमिकेत अमृता दिसणार आहे.पाकिस्तानी गृहिणीची भूमिका असल्याने अर्थातच अमृताला ह्या फिल्ममध्ये उर्दूमध्ये संवाद होते. आपल्या ‘कट्यार काळजात घुसली’ ह्या सिनेमातही अमृताने उर्दू भाषेत संवाद म्हटले होते. त्यानंतर पून्हा एकदा आता ‘राजी’मध्ये मुस्लिम भूमिकेत ती दिसणार आहे. ‘कट्यार..’नंतर हा सिनेमा करताना पून्हा एकदा अमृताने उर्दूच्या शिकवण्या घेतल्या.अमृता ह्याविषयी म्हणते, “कट्यारपेक्षाही ह्या सिनेमात जास्त कठीण उर्दू होतं. त्यात मी मशहूर गीतकार-शायर गुलजार ह्यांच्या कन्येसमोर उर्दू बोलणार असल्याने, मी सेटवर जाताना तयारीतच गेले. भूमिकेचा संपूर्ण अभ्यास आणि त्यातल्या बारकाव्यांसह मी सेटवर पोहोचल्याचे पाहून पहिल्याच दिवशी मेघनामॅमनी माझ्या तयारीचं कौतुक केले.”ती पूढे म्हणते, “मी ऑडिशनला गेले तेव्हा माझ्या उर्दू उच्चारणांकडे पाहून त्या खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यामूळेच तर ऑडिशन झाल्या-झाल्या मला धर्मा प्रॉडक्शनने साइन केले.सिनेमाचे शुटिंग सुरू झाल्यावर काही सीन्समध्ये अवघड उर्दू संवादही मी अस्खलित बोलल्याने मेघनामॅमने माझी पाठ थोपटली.आणि ह्याचा अर्थातच मला अभिमान वाटतो.” जॉन अब्राहम नंतर आता अमृता मनोज वाजयेपी साबत एका चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरी करणार असून निखिल अडवाणी या चित्रपटाचा निर्माता आहे.या चित्रपटाचे नाव अद्याप ठरले नसले तरी या चित्रपटाचे चित्रीकरण काहीच दिवसांत सुरू होणार असल्याचे कळतेय.या चित्रपटात काम करण्यास अमृता चांगलीच उत्सुक आहे. अमृता सांगते, मनोज वाजपेयी हे खूप चांगले अभिनेते आणि माणूस असल्याने त्याच्यासोबत काम करण्यास मी खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या रिडिंग सेशन्समध्ये मी खूप नव्हर्स होते.पण मनोज सरांनी मला खूप कम्फर्टेबल केले.एका दिग्गज कलाकाराचे मागर्दर्शन या चित्रपटामुळे मला लाभणार असल्याचा मला आनंद होत आहे. यासोबतच माझा राजी देखील चित्रपट काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मी आलिया भट्ट सोबत काम केले आहे.'हायवे' या चित्रपटानंतर मी आलिया भट्टची चाहती झाली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना ती एक खूप चांगली सहकलाकार असल्याचे देखील मला जाणवले. हिंदी चित्रपटसृष्टीत ज्याप्रकारे काम चालते, त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.