Join us  

'माझा अगडबम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 6:05 PM

लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या 'माझा अगडबम' या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले.

ठळक मुद्दे'अगडबम'चा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीलातृप्ती भोईरसोबत झळकणार सुबोध भावे

सुपरहिट 'अगडबम'चा दमदार सिक्वल असलेल्या 'माझा अगडबम' हा सिनेमा चर्चेचा विषय ठरतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या सिनेमाच्या पोस्टरमुळे, 'माझा अगडबम' हा सिनेमा पूर्वीपेक्षा अधिक डबल धमाका करणार असल्याचे दिसून येत आहे. लेखिका, दिग्दर्शिका, निर्माती आणि अभिनेत्री अशा चारसूत्री भूमिकेतून लोकांसमोर येणाऱ्या तृप्ती भोईरच्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर पोस्टर लाँच करण्यात आले.

'माझा अगडबम'च्या या पोस्टरवर तृप्तीने साकारलेली अगडबम नाजूका आणि तिचा पती रायबाच्या भूमिकेतला सुबोध भावे आपल्याला पाहायला मिळतो. पण या दोघांबरोबरच आणखीन एक अगडबम व्यक्ती यात आपल्याला दिसून येत आहे. अशा या दोन अगडबम व्यक्तींच्यामध्ये अडकलेला सुबोध भावे या सिनेमाच्या पोस्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो.  

'माझा अगडबम' या सिनेमाचा हा पोस्टर लोकांचे भरघोस मनोरंजन करण्यास यशस्वी ठरत आहे. 'पेन इंडिया लिमिटेड कंपनी'चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्सअंतर्गत या सिनेमाची प्रस्तुती होत असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.  टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा, अक्षय जयंतीलाल गडा यांनी तृप्तीसह सिनेमाच्या निर्मात्यांची धुरा सांभाळली आहे. तसेच या सिनेमाच्या सहनिर्मात्यांच्या फळीत रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि नीरज गाला यांचा समावेश आहे. बल्लू सलुजा यांनी या सिनेमाचे संकलन केले असून, मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर या मराठीतील आघाडीच्या गीतकारांच्या गाण्यांना टी. सतीश चक्रवर्ती यांनी संगीत दिले आहे. असा हा दर्जेदार कलाकृतीने नटलेला ‘माझा अगडबम’ सिनेमा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची खुमासदार मेजवानी ठरेल, यात शंका नाही.

टॅग्स :सुबोध भावे