Join us  

MAULI TRAILER: रितेश देशमुखच्या ‘माऊली’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च, सलमान खानचा जागा झाला मराठी बाणा….!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 12:33 PM

या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे.

''हात भारी.... सगळंच लय भारी'', या डायलॉगने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखचा पहिलावहिला मराठी सिनेमा लय भारी सिनेमातील या डायलॉगने मराठी मनावर आणि तरुणाईवर जादू केली होती. रुपेरी पडद्यावरील रितेशचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला होता. त्यामुळेच की काय या सिनेमाने तिकीट खिडकीवर कमाईचे नवनवे रेकॉर्ड्सही रचले होते. लय भारी सिनेमातील रितेशने साकारलेला 'माऊली' रसिकांच्या काळजात घर करुन गेला होता. लय भारी या सिनेमाच्या यशामुळे रितेशच्या दुसऱ्या मराठी सिनेमाची रसिकांना उत्सुकता लागली होती. हिंदीत विविध सिनेमात झळकणारा रितेश मराठीत पुन्हा एकदा कधी दिसणार असा प्रश्न रसिकांना पडला होता. आता रसिकांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण रितेशचा दुसरा मराठी सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'माऊली' असं या सिनेमाचं नाव असेल. 

या सिनेमाचा टीझर आणि गाणं लॉन्च झाल्यानंतर माऊलीचा ट्रेलर समोर आलाय. २ मिनिटे ५० सेकंदाचा हा ट्रेलर आहे. या सिनेमात रितेश एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. माऊली सर्जेराव देशमुख असं त्या व्यक्तीरेखेचं नाव आहे. या ट्रेलरमध्ये गावातले गुंड धुमाकूळ माजवत असतात त्याचवेळी रितेश म्हणजेच माऊलीची एंट्री होते. इन्स्पेक्टर माऊली सर्जेराव देशमुख म्हणत्यात मला...आपल्या सारखा TERROR नाय.... असा त्याचा डायलॉग आहे. या ट्रेलरला अनेकांची पसंती मिळतेय. दबंग सलमान खानलाही हा ट्रेलर भावला आणि त्याचा मराठी बाणा जागा झाला. त्याने हा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहलं की सर्वांचा माऊली आणि आपला भाऊ येतोय, एन्ट्री वर शिट्टी नक्कीच वाजवा… 

काही दिवसांपूर्वीच 'माऊली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. खुद्द शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंवरून टीझर शेअर केला होता.कार्तिकी एकादशीच्या शुभमुहूर्तावर, माऊलीचं पहिलं गाणं!! माझी पंढरीची माय!! रितेशने शेअर करताच त्या व्हिडीओलाही रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. 

टॅग्स :माऊलीसलमान खानरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा