Join us  

गोव्याच्या किनाऱ्यावर मराठमोळी मृण्मयी देशपांडे दिसली बोल्ड अंदाजात, फॅन्स झाले फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 7:00 AM

मृण्मयी देशपांडे हिने नुकतेच इंस्टाग्रामवर गोवा व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. नुकतेच तिने काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना पहायला मिळाला. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळतो आहे.

मृण्मयी देशपांडेने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, गोव्याची आठवण येते आहे.  या फोटोमध्ये मृण्मयीने फ्लॉवर प्रिंट असलेला क्रॉप टॉप आणि व्हाइट रंगाची पॅण्ट घातली आहे. या फोटोत तिचा बोल्ड अंदाज पहायला मिळतो आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.    वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.

नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा  मृण्मयी देशपांडेने उमटविला आहे. मृण्यमयीने फर्जद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.

शेवटची मृण्मयी देशपांडे ‘मन फकीरा’ चित्रपटात दिसली होती. या सिनेमाच्या माध्यमातून मृण्मयीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

टॅग्स :मृण्मयी देशपांडे