Join us  

मराठमोळी अभिनेत्री मानसी मोघे दिसणार 'ख्‍वाबों के परिंदे'मध्‍ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 9:42 PM

अभिनेत्री मानसी मोघेने २०१५ साली 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

अभिनेत्री मानसी मोघेने २०१५ साली 'बुगडी माझी सांडली गं'मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटानंतर ती २०१६ साली आणखीन एका मराठी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती मराठी सिनेसृष्टीत काम करताना दिसली नाही. मात्र लवकरच ती 'ख्‍वाबों के परिंदे' या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. तपस्‍वी मेहता दिग्‍दर्शित वूटवरील 'ख्‍वाबों के परिंदे'मध्‍ये मानसी मोघेसोबत आशा नेगी, मृणाल दत्त आणि तुषार शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.ही सीरिज वूटवर १४ जूनपासून पाहायला मिळणार आहे. 

ऑस्‍ट्रेलियामधील नयनरम्‍य ठिकाणी चित्रित करण्‍यात आलेली सिरीज 'ख्‍वाबों के परिंदे' तीन प्रमुख पात्र – बिंदीया, दिक्षित व मेघा यांच्‍या जीवनांच्‍या अवतीभोवती फिरते. युनिव्‍हर्सिटी ऑफ मेलबर्नमधून पदवी शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर अतिउत्‍साही बिंदीया तिच्‍या दोन सर्वात विश्वसनीय मित्र दिक्षित व मेघाला तिच्‍यासोबत मेलबर्नपासून पर्थपर्यंत महत्त्वाकांक्षी व विलक्षण रोड ट्रिपवर घेऊन जाते. त्‍यांच्‍या प्रवासादरम्‍यान त्या विलक्षण, विनोदी व प्रबळ सहयात्री आकाशला भेटतात. ही ट्रिप प्रत्‍येकासाठी खूपच खास असते, कारण या प्रवासामधून त्‍यांना स्‍वत:चा पुनर्शोध घेण्‍याची आणि एकमेकांचे प्रामाणिक सहयोगी बनण्‍याची संधी मिळते. 

याबाबत मानसी मोघे म्‍हणाली, 'ख्‍वाबों के परिंदे' ही सुरेख व साधी कथा असण्‍यासोबत आजच्‍या तरूणांशी संबंधित आहे आणि प्रेक्षकांशी संलग्‍न होईल. ही सिरीज तुम्‍हाला मित्र कशाप्रकारे तुमचे सर्वात मोठे सामर्थ्‍य बनू शकतात, चांगल्‍या क्षणांना व्‍यतित करू शकतात आणि खडतर काळामध्‍ये साह्य करू शकतात या बाबींना दाखवते.

या सिरीजसाठी काम करण्‍याचा अनुभव माझ्यासाठी अद्भुत होता. मी आशा करते की, प्रेक्षक देखील ही सिरीज पाहण्‍याचा आनंद घेतील. तपस्‍वी व टीमने ऑस्‍ट्रेलियाच्‍या नयनरम्‍य ठिकाणांना सुरेखरित्‍या कॅप्‍चर केले आहे, म्‍हणूनच व्हिज्‍युअल्‍स व कथेच्‍या मूडमध्‍ये सुसंगतपणा आल्याचे मानसी सांगते.

टॅग्स :मानसी मोघे