Join us  

मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘पगल्या’ मराठी चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट विदेशी भाषा पुरस्काराने गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 12:31 PM

‘पुगल्या’ या चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म २०२१ चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला.

ठळक मुद्देडॉ. सुनिल खराडे यांनी एका लघुपटासाठी ‘पगल्या’ ही कथा लिहिली होती. पण ही कथा लिहून झाल्यानंतर या कथेवर लघुपट बनवण्याऐवजी एखादा चित्रपट बनवूया. या कथेचा खूपच चांगला चित्रपट होईल असे त्यांना वाटल्याने त्यांनी हा चित्रपट बनवण्याचे ठरवले.

मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल नुकतेच पार पडले. त्या चित्रपटात पगल्या या मराठी चित्रपटाला पुरस्कार मिळाला असून या चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. 

‘पगल्या’ या चित्रपटाला मॉस्को इंटरनॅशनल फिल्म २०२१ चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड हा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला मिळालेल्या या यशामुळे या चित्रपटाची टीम प्रचंड खूश आहे. 

डॉ. सुनिल खराडे यांनी एका लघुपटासाठी ‘पगल्या’ ही कथा लिहिली होती. पण ही कथा लिहून झाल्यानंतर या कथेवर लघुपट बनवण्याऐवजी एखादा चित्रपट बनवूया. या कथेचा खूपच चांगला चित्रपट होईल असे त्यांना वाटल्याने त्यांनी हा चित्रपट बनवण्याचे ठरवले. हा चित्रपट लहान मुलं आणि कुत्र्यांच्या नात्यावर आधारित आहे. वृषभ आणि दत्ता अशा दोन मुलांची या चित्रपटात कथा दाखवण्यात आली असून त्यातील वृषभ हा शहरी भागातील तर दत्ता हा ग्रामीण भागातील आहे. या दोघांची एकमेकांशी ओळख नसते. पण त्या दोघांना देखील एक कुत्रा सांभाळण्याची इच्छा असते. वृषभला त्याच्या घरातील मंडळी एक कुत्रा भेट म्हणून देतात. पण हा कुत्रा त्याच्याकडून हरवतो आणि तो दत्ताला मिळतो अशी या चित्रपटाची कथा आहे. या चित्रपटातील दोन्ही कलाकार हे 10 वर्षांचे आहेत. 

‘पगल्या’ या चित्रपटाची इटली, अमेरिका, युके आणि स्वीडन या देशातील १९ चित्रपट महोत्सवात देखील निवड झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते विनोद सॅम पीटर आहेत. 

टॅग्स :मराठी