Join us  

.....अन तिने पहिल्याच सिनेमात स्वीकारलं चॅलेंज !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:03 PM

रीनाने घेतलेली ही रिस्क खरंच कौतुकास्पद आहे,कारण जो आव्हान स्वीकारून ताठ मानेने उभा राहतो तोच खरा कलाकार.... आणि रीना ने हे स्वतःच्या अभिनयातून सिद्ध केले आहे.

कलाकाराच्या आयुष्यात त्याच्या वाट्याला आलेला प्रथम सिनेमा हा खूप स्पेशल असतो. आणि त्या सिनेमात खरं उतरण्यासाठी मनापासून मेहनत करतात मग ते आपल्या फिटनेस बद्दल असो किंवा लूक वर . अनेक कलाकार आपल्या त्या त्या भूमिकेसाठी कसून मेहनत करत असतो. मराठी सिनेसृष्टीमध्ये अभिनय करणं हे प्रत्येक कलाकाराच्या बकेट लिस्ट मध्ये असतं ,मग त्याचा मोह बॉलिवूडकरांनाही आवरत नाही. आपल्या पहिल्या भूमिकेत सहसा मराठी सिने अभिनेत्री एखादा रोमँटिक भूमिका साकारण्यास पसंती दाखवतात परंतु एक अशी अभिनेत्री आहे जिने आपल्या पहिल्याच चित्रपटात सर्वात कठीण असं चॅलेंज स्वीकारलयं .

मराठी सिनेसृष्टीमध्ये पहिल्यांदाच प्रमुख भूमिकेत सर प्रेक्षकांसमोर येणारी अभिनेत्री आहे रीना अगरवाल.... आपण आतापर्यंत तिला "टिया" , "आरती" आणि आता  "कॅरी ऑन गर्ल" याच नावाने ओळखत होतो , पण आता ती प्रेक्षकांसमोर एक नव्या नावाने समोर येत आहे ज्याचं नाव आहे "मीरा" . आशिष भेलकर दिग्दर्शित " ३१ दिवस" या चित्रपटात अभिनेता शशांक केतकर यासोबत ती प्रमुख भूमिकेत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या चित्रपटात रीना एका अंध शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. 

अभिनेत्री रीना अगरवाल हिने या आधीदेखील तलाश, बेहेन होगी तेरी, एजंट राघवमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. अजिंठा चित्रपटात रीना सोनाली कुलकर्णी सोबत सहाय्यक अभिनेत्री म्हणून अभिनय केला. "प्लास्टिक बंदी" या विषयावर भन्नाट अशी चित्रफित "कॅरी ऑन" मध्ये हटके भूमिका साकारून रीनाने नेटकऱ्यांची मने जिंकली. "३१दिवस" या चित्रपटात रीना एका अंध शिक्षिकेच्या भूमिकेत सर्वांसमोर आली आहे. हा सिनेमा तिच्या सिने आयुष्यातील पहिला प्रमुख भूमिका असलेला सिनेमा आहे , पण यामध्ये तिने अंध व्यक्तीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणं खरचं खूप महत्वाची गोष्ट आहे.

एखाद्या सिनेअभिनेत्रीची तिच्या वाटेल पहिला सिनेमा हा खुप स्पेशल असतो , पण पहिल्याच सिनेमात "रिस्क" घेणं हे सहसा टाळलं जातं. रीना ने घेतलेली ही रिस्क खरंच कौतुकास्पद आहे,कारण जो आव्हान स्वीकारून ताठ मानेने उभा राहतो तोच खरा कलाकार.... आणि रीना ने हे स्वतःच्या अभिनयातून सिद्ध केले आहे.