Join us  

मराठीतील हा प्रसिद्ध विनोदी कलाकार लवकरच दिसणार हिंदी चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 2:49 PM

कॉमेडी रिएलिटी शोमधून सर्वांना खळखळून हसविणारा विनोदवीर समीर चौघुले लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे.

ठळक मुद्देसमीर चौघुले दिसणार हिंदी चित्रपटात

कॉमेडी रिएलिटी शोमधून सर्वांना खळखळून हसविणारा विनोदवीर समीर चौघुले लवकरच हिंदी चित्रपटात झळकणार आहे. याबाबतची माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावर दिली आहे. सध्या समीर चौघुले सोनी मराठी वाहिनीवरील  हास्य जत्रा- पर्व २’ शोमध्ये आपल्या विनोदी शैलीने रसिकांना भुरळ पाडत आहे.

समीर चौघुलेने हिंदी चित्रपटाच्या सेटवरील अभिनेता शरद सक्सेना यांच्यासोबतचा फोटो शेअर करीत लिहिले की, उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये हिंदी सिनेमाचे चित्रीकरण करतो आहे. माझ्यासोबत अभिनेता शरद सक्सेना आहेत. त्यांनी जवळपास ४०० चित्रपटांत काम केले आहे. खूप चांगले व्यक्ती ते आहेत. ८ डिग्री सेल्सिअस तापामानात चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच वेगळा व अप्रतिम आहे.

समीर चौघुलेने शेअर केलेल्या फोटोत ते दोघे एथनिक कपड्यात दिसत आहेत. तो कोणत्या सिनेमात काम करतो आहे व या चित्रपटाच्या कथानाकाबद्दल आणि कलाकारांबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. आता तो त्याच्या आगामी हिंदी चित्रपटाबाबतची माहिती कधी देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

'महाराष्ट्राची हास्य जत्रा- कॉमेडीचे जहागिरदार' या फॉरमॅटमध्ये समीर चौघुले, विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे, अरुण कदम, अंशुमन विचारे आणि त्यांच्या सोबतीला ८ नवीन कॉमेडीयन्स ‘सेलिब्रेशन’ या थीमवर आधारित अफलातून स्किट सादर करणार आहेत. मग ते सेलिब्रेशन लग्नाच्या वाढदिवसाचेही असू शकते आणि ऑफिसमधील शेवटचा दिवस असल्याने बॉसला दिलेली सेंड ऑफ पार्टीपण असू शकते.

टॅग्स :समीर चौगुले