Join us  

कोरोनामुळे खचलेल्या लोकांचे मनोबल वाढण्यासाठी मराठी कलाकारांनी रसिकांच्या भेटीस आणले हे गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 3:12 PM

लोकांमध्ये धैर्य आणि मनोबल वाढण्यासाठी मराठी कलाकारांनी एकत्र येऊन हे नवे कोरे गाणे रसिकांसमोर आणले आहे.

ठळक मुद्देअभिनेता मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, देवदत्त नागे, किरण गायकवाड आणि दिपाली सय्यद असे कलाकार या निमित्ताने एकत्र आले आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील ढासळली आहे. या काळात लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. 

कलाकारांना एकत्र आणून समाजातील सकारात्मकता वाढविण्यासाठी "पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ" हे राजू अनासपुरे, अमोल घोडके आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी निर्मिती केलेले गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेकांच्या मनामध्ये नकारात्मकता वाढत आहे. लोकांमध्ये धैर्य आणि मनोबल वाढण्यासाठी कलाकारांनी एकत्र येऊन हे नवे कोरे गाणे रसिकांसमोर आणले आहे... या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने  केले असून तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं हे गाणे स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

अभिनेता मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड आणि दिपाली सय्यद असे कलाकार या निमित्ताने एकत्र आले आहेत. गाण्याचे दिग्दर्शन आणि संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून संगीत जीवन मराठे यांनी दिले आहे, गाण्याचे शब्द वैशाली मराठे, सुरेखा मराठे, शौनक कंकाल यांचे असून  जीवन मराठे, कविता राम, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस यांनी हे गाणं गायलं आहे. पोस्टर अनिल शिंदे यांनी बनवलं आहे. गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यदची आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या