Join us

ही मराठी अभिनेत्री वळली बॉलिवूडकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 12:59 IST

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री विभावरी देशपांडे ही लवकरच बॉलिवूडच्या एका चित्रपटात झळकणार आहे. ती बॉलिवूडची तगडी अभिनेत्री ...

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री विभावरी देशपांडे ही लवकरच बॉलिवूडच्या एका चित्रपटात झळकणार आहे. ती बॉलिवूडची तगडी अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्यासोबत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट आदित्य कृपलानीच्या टिकली अँण्ड लक्ष्मी बाँम्ब या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात विभावरी आणि स्वरा वेश्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील आदित्य कृपलानी करणार आहे. या चित्रपटात या दोघी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाविषयी लोकमत सीएनएक्सला विभावरी सांगते, बॉलिवूडमध्ये काम करणे हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तसेच हा बॉलिवुड चित्रपट असण्यापेक्षा  त्याचा आशय खूप छान आहे. अशा ताकदनान स्क्रीप्टची वाट खूप दिवसांनी पाहत होते. तसेच तनू वेडस मनू , रांजणा या चित्रपटात स्वराच काम पाहिल होत. त्यामुळे ती हुशार असल्याचे जाणविले होते. अशा माणसाचे काम पाहिल्यावर वाटतेच की, आयुष्यात अशा माणसाबरोबर कनेक्ट व्हावे. तसेच अशा व्यक्तींबरोबर काम करणे एक आव्हान पण असते. त्यामुळे या चित्रपटासाठी मी स्वत:देखील खूप उत्साही आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण जानेवारीमध्ये सुरू होणार आहे. विभावरीने  नेहमीच नाटक, मालिका आणि चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखविली आहे. तिने श्वास, सातच्या आत घरात, हरिश्चंद्राची फॅक्टरी, देऊळ, नटरंग, बालगंधर्व अशा अनेक सुपरहीट चित्रपटात काम केले आहे. तर स्वरानेदेखील बॉलिवुडमध्ये रांजणा, मैं प्रेम की दिवानी, गुजारिश असे अनेक चित्रपट केले आहेत.