Join us  

"कोणी काम देता का काम" म्हणणारी अभिनेत्री बनली उद्योजिका,पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 8:02 PM

लॉकडाऊन दरम्यान अनेक कलाकारांकडे काम नसल्यामुळे कामाच्या शोधात दिसले होते. काहींनी सोशल मीडियाचा आधार घेत कामासाठी शोधाशोध सुरु केली होती.

कलाकार मंडळी मालिका आणि सिनेमात अभिनय करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही विशेष लक्ष देऊ लागले आहेत. अभिनयासह स्वतःचा बिझनेस सुरु करण्याचा हा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही रुढ झाला आहे.अभिनेत्री शाश्वती पिंपळेकरनेही स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे. अभिनयाशिवाय काही तरी हटके करण्याचा प्रयत्न शाश्वतीने केला आहे. याविषयाची माहिती तिने सोशल मीडियावर दिली आहे. शाश्वतीच्या या नव्या उपक्रमाला तिचे फॅन्स आणि मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. 

लॉकडाऊन दरम्यान अनेक कलाकारांकडे काम नसल्यामुळे कामाच्या शोधात दिसले होते. काहींनी सोशल मीडियाचा आधार घेत कामासाठी शोधाशोध सुरु केली होती.अभिनेत्री शाश्वती पिंपळेकरनेही कामाच्या शोधात असल्याची पोस्ट शेअर केली होती. नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करुइच्छीत आहे. तेव्हा मी करण्या योग्य काम कोणाकडे असेल तर संपर्क साधा..' अशी पोस्ट शाश्वतीने

 

 

लॅाकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर शेअर केली होती तेव्हापासून ती प्रचंड चर्चेत होती. मुळात अभिनय क्षेत्रावर निर्भर न राहता शाश्वतीने स्वतःचा व्यवसाय सुरु करत उद्योजिका बनली आहे. एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता दुसरा पर्याय शोधणे हीच काळाची गरज असल्याचे शाश्वतीमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

शाश्वतीने फोटोग्राफर राजेंद्र करमरकरशी लग्न केलं आहे. शाश्वतीने आतापर्यंत अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. 'चाहूल', 'पक्के शेजारी', 'सिंधू' या मालिकेत ती झळकली आहे. मालिकाच नाही तर सिनेमातही ती झळकली आहे रवी जाधव दिग्दर्शित 'बालक पालक' सिनेमातही शाश्वतीने 'डॉली' हे पात्र साकारलं आहे. तिच्या या भूमिकेचं कौतुकही झालं होतं.