Join us  

मुंबईच्या ट्राफिकमध्ये अडकली रिंकू राजगुरू, पोस्ट शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 4:35 PM

मुंबईच्या ट्राफिकला कंटाळून रिंकू राजगुरूने शेअर केली पोस्ट, म्हणाली...

मायानगरी मुंबईचं ट्राफिक हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. मुंबईतील वाहतूक कोडींचे अनेक फोटो आणि व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. वाहतूक कोडींच्या अनेक पोस्टही सोशल मीडियावर फिरताना दिसतात. कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक यांच्याप्रमाणेच कलाकारांना मुंबईच्या या ट्राफिकचा त्रास होतो. अनेक कलाकार याबाबत सोशल मीडियावरुन व्यक्त होताना दिसतात. आता मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरूने मुंबईच्या वाहतूक कोडींबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 

रिंकूने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक स्टोरी शेअर केली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये रिंकूने मुंबईच्या ट्राफिकचा फोटो शेअर केला आहे. मुंबईच्या ट्राफिकला कंटाळून रिंकूने ही पोस्ट केली आहे. रिंकूने गाडीतून हा फोटो क्लिक केला आहे. तिच्या गाडीसमोर वाहनांच्या रांगा लागल्याचं फोटोत दिसत आहे. या फोटोला तिने "मुंबई ट्राफिक" असं कॅप्शन देत इमोजीही पोस्ट केले आहेत. रिंकूची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

'सैराट'मधून प्रसिद्धीझोतात आलेली रिंकू राजगुरू आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. पहिल्याच चित्रपटाने रिंकूला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं. 'सैराट'मधील आर्चीमुळे रिंकूचं आयुष्यच बदलून गेलं. रातोरात सुपरस्टार झालेली रिंकू आजही कित्येक चाहत्यांची क्रश आहे. रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल ती चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असते. 

'सैराट'नंतर रिंकू अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारताना दिसली. 'कागर', 'आठवा रंग प्रेमाचा' या मराठी चित्रपटांत तिने काम केलं आहे. नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मध्ये रिंकू अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसली. रिंकूने चित्रपटांबरोबरच वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.  

टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी चित्रपटमुंबई