Join us  

'तेरी अदा पे तो हम फिदा हैं'; नजरेच्या हरकतींनी ऐश्वर्या नारकरने पुन्हा केलं चाहत्यांना घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 11:50 AM

Aishwarya narkar: ऐश्वर्या नारकर यांनी अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या मालिकेतील सेटवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वयाची ५० पार केल्यानंतरही ऐश्वर्या नारकर यांनी त्यांचा फिटनेस कायम ठेवला आहे. इतकंच नाही तर २०-२२ वर्षाच्या तरुणींना लाजवेल असं फोटोशूट करुनही त्या कायम चर्चेत येत असतात. अनेकदा त्या सेटवरुन किंवा घरातूनच त्यांचं हटके व्हिडीओ पोस्ट करत असतात. यावेळी त्यांनी मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या नजरेच्या हरकती करताना दिसत आहेत.

ऐश्वर्या नारकर यांनी अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्या मालिकेतील सेटवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच त्यांनी मालिकेतील गेटअपमध्येच हा व्हिडीओ शूट केला आहे.

ऐश्वर्या नारकरच्या लेकाला कधी पाहिलंय? आईइतकाच दिसतो देखणा

दरम्यान, 'रंगीला' चित्रपटातील 'है रामा ये क्या हुआँ' या गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओ शूट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी Refreshing myself, असं कॅप्शन दिलं आहे. थोडक्यात शुटिंगमधून जरासा वेळ मिळाला की त्या इन्स्टाग्राम रिल्स, फोटोशूट करुन त्यांचा वेळ घालवत असतात. सध्या त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी असंख्य कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पाडला आहे.

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीसिनेमा