Join us  

Video : असं असतं ऐश्वर्या नारकरचं फोटोशूट; पाहा 'बिहाइंड द सीन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 11:32 AM

Aishwarya narkar: ऐश्वर्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो चांगलेच चर्चिले जात आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून आलेल्या ऐश्वर्याने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळेच आज तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच चाहत्यांच्या कायम संपर्कात राहण्यासाठी ऐश्वर्या सोशल मीडियाचा वापर करत असते. अनेकदा ती सोशल मीडियावर काही फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो चांगलेच चर्चिले जात आहेत. त्यामुळेच हे हटके फोटोशूट ती नेमकी कशा पद्धतीने करते समोर आलं आहे. ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत  फोटोशूटचा 'बिहाइंड द सीन' शेअर केला आहे. 

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी ऐश्वर्या गेल्या काही काळापासून तिच्या ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे तिचे फोटो पाहिल्यावर वय हा निव्वळ आकडा आहे याचीच जाणीव होते. त्यामुळे तिचे फोटोशूट कायमच चर्चेत असतात. परंतु, फ्रेममध्ये सुंदर आणि बोल्ड दिसणारी ऐश्वर्या तिचं फोटोशूट करण्यासाठी कशी मेहनत घेते हे तिने शेअर केले आहे.

वय केवळ आकडाच! ऐश्वर्या नारकरने केलं बोल्ड फोटोशूट

अलिकडेच ऐश्वर्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला Urvashi Urvashi Take It Easy Urvashi हे गाणं वाजत आहे.  सोबतच ऐश्वर्या वेगवेगळ्या साड्यांमध्ये सुंदर फोटोशूट करत आहे. यात कॅमेरा, लाइट्स सारं काही पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ऐश्वर्या ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने 'अपराध', 'धड़क', 'अंकगणित' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच 'श्रीमंता घरची सून', 'दुहेरी', 'रेशीमगाठी','सोनपावले', 'या सुखांनो या','स्वामिनी', 'ये प्यार ना होगा कम','घर की लक्ष्मी बेटीयाँ' अशा असंख्य मालिकांमध्ये ती झळकली आहे. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकर