Join us  

लॉकडाऊनमध्ये व्हायरल होतोय सुबोध भावे आणि त्याच्या पत्नीचा हा जुना फोटो, एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे त्यांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 12:32 PM

सुबोध भावेने आज मिळवलेल्या यशामागे एका खास व्यक्तीचा हात आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची पत्नी मंजिरी आहे. मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे.

ठळक मुद्देसुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता.

सुबोध भावेने आज मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, सुबोधने त्याचे शिक्षण पुण्यातील सिम्बोसिस कॉलेजमधून पूर्ण केले असून त्याने अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी एका आयटी कंपनीत सेल्समनचे काम देखील केले होते. पण सुबोधला सुरुवातीपासूनच अभिनयात रस असल्याने तो या क्षेत्राकडे वळला आणि त्याने या क्षेत्रात चांगलेच नाव कमावले.

सुबोध भावेने आज मिळवलेल्या यशामागे एका खास व्यक्तीचा हात आहे. ही व्यक्ती दुसरी कोणी नसून त्याची पत्नी मंजिरी आहे. मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण सुबोधला अभिनय येत नसल्याने त्याला नाटकातून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे तो बॅकस्टेजला काम करत होता तर मंजिरी नाटकात काम करत होती. तिला पाहाताच क्षणी सुबोध तिच्या प्रेमात पडला. त्या दोघांची शाळा वेगळी होती. त्यामुळे सुबोध मंजिरीला पाहण्यासाठी अनेकवेळा नाक्यावर उभा राहायचा. त्यावेळी त्यांच्यात केवळ नजरानजर व्हायची.

काही महिन्यांनंतर हळूहळू सुबोध आणि मंजिरीमध्ये मैत्री झाली आणि त्यानंतर त्याने शुगर इज शुगर, सॉल्ट इज सॉल्ट, इफ आय लव्ह यू, व्हॉट इज माय फॉल्ट असे लिहून देत मंजिरीला प्रपोज केले. त्यावर मंजिरीने मी बालगंधर्वच्या पुलावर आले तर माझा होकार असेल असे सुबोधला सांगितले होते आणि ती खरंच त्या पुलावर आली आणि सुबोधला उत्तर मिळाले. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कल्पना कुटुंबियांना देखील दिली. पण तुम्ही शिक्षण पूर्ण करा असा सल्ला त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना दिला. त्या दोघांचे शिक्षण सुरू होते. त्याच दरम्यान मंजिरी बारावीत असताना कॅनडाला शिफ्ट झाली. त्यावेळी केवळ पत्रांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क असायचा. कॅनडातून परतल्यावर त्या दोघांनी पुण्यात एकाच ठिकाणी नोकरी केली आणि त्यानंतर साखरपुडा केला. लग्न झाले त्यावेळी सुबोध नोकरी करत होता. पण कामात मन रमत नसल्याने त्याने नोकरी सोडून पूर्ण वेळ अभिनयाला दिला. त्याच्या संघर्षाच्या काळात मंजिरीने त्याला साथ दिली.

सुबोध आणि मंजिरीला दोन मुले असून सुबोधच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला त्या दोघांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.

टॅग्स :सुबोध भावे