Join us  

Video : जेव्हा बायको खूप दिवसांनी भेटते...; सिद्धार्थ चांदेकरनं शेअर केलं भन्नाट रील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:05 PM

Siddharth Chandekar Mitali Mayekar : होय, रील तर भन्नाट आहेच. शिवाय यावर मितालीनं केलेली कमेंट सुद्धा चांगलीच लक्षवेधी आहे.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( Siddharth Chandekar )आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक गोड जोडपं. दोघंही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. दोघांचे क्युट आणि रोमॅन्टिक फोटो, व्हिडीओ, रिल्स क्षणात व्हायरल होतात. सध्या या कपलने असंच एक मजेशीर रील शेअर केलं आहे. होय, ही रील तर भन्नाट आहेच. पण यावर मितालीनं केलेली कमेंट चांगलीच लक्षवेधी ठरली आहे. मिताली गेल्या काही दिवसांपासून गोव्यात होती. गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी ती गेली होती. खूप दिवसानंतर मिताली घरी परतली आणि नवरोबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. होय, खूप दिवसांनी मितालीला पाहून सिद्धार्थला इतका आनंद झाला की विचारू नका.

हा आनंद त्यानं कसा व्यक्त केला? तर यासाठी तुम्हाला बातमीसोबतचं रील बघावं लागेल. ‘खूप दिवसांनी जेव्हा तिची भेट होते...,’ असं कॅप्शन देत सिद्धार्थने हे रील शेअर केलं आहे. 

सिद्धार्थ व मितालीच्या या फनी रीलवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत. पण सगळ्यात खास आहे ती मितालीची कमेंट. होय, नवऱ्यानं शेअर केलेल्या या फनी रीलवर मितालीनं केलेल्या कमेंटचीच सध्या चर्चा आहे. ‘हा..हा...हा.... इडियट...,’अशी कमेंट मितालीनं केली आहे.

  24 जानेवारी 2019 या दिवशी सिद्धार्थ आणि मितालीचा साखरपुडा झाला. त्याच्या बरोबर दोन वर्षे आधी म्हणजेच 24 जानेवारी 2017 या दिवशी मिताली आणि सिद्धार्थ एकमेकांना भेटले होते. या कार्यक्रमात ओळख झाल्यानंतर दोघांनी इंस्टाग्राम वर चॅटिंग सुरू केली. पण या चॅटींगचा विषय काय असायचा माहितीये काय? तर हॅरी पॉटर. होय, दोघेही पॉटरहेड असल्यामुळे जवळ जवळ दोन महिने याच विषयावर गप्पा मारायचे. हॅरी पॉटर बद्दलच्या पोस्ट इंस्टाग्रामवर एकमेकांना शेअर करायचे. इंस्टाग्रामच्या या क्षणांची आठवण म्हणून दोघांनीही हातावर इंस्टाग्रामचा टॅटू काढून घेतला आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर