Join us  

याला अटक करा! कुत्र्याला मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर संतापला रितेश देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 4:55 PM

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ शेअर करत रितेशने संताप व्यक्त केला आहे.

रितेश देशमुख हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत त्याने आपला जम बसवला आहे. २००३ साली 'तुझे मेरी कसम' या हिंदी सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलेल्या रितेशने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. रितेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. महाराष्ट्राचा लाडका दादा असलेला रितेश सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 

नवीन प्रोजेक्टच्या माहितीबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट्सही तो चाहत्यांना देत असतो. तर आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गोष्टींबाबतही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतो. नुकतंच त्याने इन्स्टास्टोरीवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. रितेशने शेअर केलेल्या 'पीपल फॉर अॅनिमल' या इन्स्टाग्राम पेजवरील या व्हिडिओत एक व्यक्ती कुत्र्याला वाईट पद्धतीने मारताना दिसत आहे. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ शेअर करत रितेशने संताप व्यक्त केला आहे. "या व्यक्तीला अटक करा आणि तुरुंगात टाका", असं रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

दरम्यान, रितेशने २०१२ साली अभिनेत्री जिनिलीयासोबत लग्न केलं. रितेश-जिनिलीया हे सिनेसृष्टीतील लाडके कपल आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत. रितेश-जिनिलीया अनेकदा त्यांचे फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. 

टॅग्स :रितेश देशमुखसेलिब्रिटी