Join us  

वाऱ्याच्या वेगाने गौरीने केली घोडेस्वारी; महेश मांजरेकरांच्या लेकीचा भन्नाट Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 6:15 PM

Gauri Ingawale: गौरीने नुकताच तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत सुंदररित्या घोडेस्वारी करताना दिसत आहे.

मराठी आणि हिंदी कलाविश्वातील प्रसिद्ध निर्माते- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी असंख्य चित्रपटांसाठी काम केलं आहे. मात्र, गेल्या काही काळापासून ते त्यांच्या कामांपेक्षा त्यांच्या मुलांमुळे थोडक्यात त्यांच्या मुलींमुळे चर्चेत येत आहेत. मांजरेकरांच्या एका लेकीने सई मांजरेकरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तर, दुसरी लेक गौरी इंगवले (Gauri Ingawale)हिचाही पांघरुण हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. त्यामुळे त्यांच्या या दोन्ही लेकींची सोशल मीडियावर चर्चा रंगत असते. यामध्येच सध्या गौरीचा घोडेस्वारी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असलेल्या गौरीने नुकताच तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती अत्यंत सुंदररित्या घोडेस्वारी करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवरुन तिने घोडेस्वारीचं प्रशिक्षण घेतल्याचं म्हटलं जात आहे.

सध्या सोशल मीडियावर गौरीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. इतंकच नाही तर तिच्यावर कौतुकाचा वर्षावदेखील होत आहे. या व्हिडीओमध्ये गौरी वाऱ्याच्या वेगाने घोडेस्वारी करत आहे. त्यामुळे तिच्यातील हे नवं कौशल्य नेटकऱ्यांसमोर आलं आहे.

दरम्यान, गौरी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर तिच्या डान्सचे काही व्हिडीओ, फोटो पोस्ट करत असते. मात्र, यावेळी तिने हा नवा व्हिडीओ पोस्ट करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

टॅग्स :सेलिब्रिटीमहेश मांजरेकर सिनेमा