Join us  

नवरा असावा तर असा..! मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेराने तिला दिले हे वचन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 4:44 PM

मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून सगळे म्हणत आहेत नवरा असावा तर असा.

मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्नानंतर ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली होती. नुकतेच ते दोघे मुंबईत परतले आहेत. दरम्यान आता प्रदीपने मानसीसोबतचे फोटो शेअर करत तिला वचन दिले आहे. त्याच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

मानसी नाईकचा नवरा प्रदीप खरेराने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहून सगळे म्हणत आहेत नवरा असावा तर असा. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना नेमके त्याने काय पोस्ट केली आहे. तर त्याने मानसी सोबतचे लग्नातील फोटो शेअर करत तिला वचन दिले आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, मी तुला वचन देतो की खळीपासून सुरकुत्यांपर्यंत मी नेहमीच तुझ्यासोबत असणार आहे. प्रदीप खरेराच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

मानसीचा भावी पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत.

एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

टॅग्स :मानसी नाईक