Join us  

मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबत शेअर केला रोमँटिक फोटो, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 4:55 PM

अभिनेत्री मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे.

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. मोठ्या थाटात तिचा विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला मानसीचे कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह चित्रपटसृष्टीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. त्यानंतर आता ती प्रदीप खरेराच्या गावी फरीदाबादला गेली आहे. तिथले तिने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मानसी नाईकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर प्रदीप खरेरासोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने लिहिले की, तू मला वेड्यासारखे नाचवलेस, श्वास कसा घ्यायचा हे विसरायला लावले, सोन्यासारखे चमकायला लावले, मधमाशासारखे गुंजायला लावले. माझ्या मनात विचार आला की तू मला रानटी बनवलेस. तुझ्यामुळे मी आनंदित आहे.

मानसीचा भावी पती हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता आणि मॉडेल आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात. प्रदीपच्या लूक्सवर त्याचे चाहते चांगलेच फिदा आहेत.

मानसी ही उत्तम डान्सर असून ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअ‍ॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून तिने आपल्या डान्सचे जलवे दाखवले आहेत. याशिवाय रुपेरी पडद्यावरही मानसीने आपल्या अभिनयाद्वारे रसिकांची मनं जिंकली आहेत. एकता - एक पॉवर, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, जबरदस्त, मर्डर मेस्त्री, ढोलकी, हू तू तू, कोकणस्थ यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

टॅग्स :मानसी नाईक